नाशिक ग्रामीण

चांदेश्वरी घाटात दोन ट्रक ची समोरासमोर टक्कर


वेगवान नाशिक / सोमनाथ घोंगाणे 

Nashik news नांदगाव, ता. 28 में 2024- नांदगाव तालुक्यातील कासारी जवळील चांदेश्वरी घाटात अवघड वळणावर अननस घेऊन जाणारा ट्रक एच आर ५५ अे एफ ७७९७ या गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सोमवारी दि.२७ रोजी सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान मनमाड येथून इंधन घेऊन बोलठाणच्या दिशेने घाट चढून वर येणाऱ्या जी जे झीसे चार अे डब्लू ३२५६G.या टॅंकरच्या इंधन टाकीला धडक देवून रस्त्यावर पलटी झाल्याने रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूला दोन दोन किलो मिटर रहदारी ठप्प झाली होती.

बैलांची शर्यत भवली! ग्रामपंचयतीच्या उपसरंपचासह सदस्यांवर गुन्हा दाखल

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

चांदेश्वरी घाटात अपघात ग्रस्त झालेले दोन्ही वाहने 24 तास होवून ही रस्त्यावर आहे त्या स्थितीत असल्याने इतर वाहनांना घाट चढण्यास आणि उतरण्यासाठी अडचण येत असून, त्यामुळे आणखी इतर वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी पोलिस विभागाने तातडीने दोन्ही वाहने बाजूला करण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी इतर वाहन चालक मालक करत आहेत.

सिन्नरः डिकीमधून दीड लाख पळविले, बॅंक पासबुकही गेलं…

काही महिन्यांपासून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड ते चाळीसगाव रस्त्यावर असलेला घाट रहदारीसाठी अवजड वाहनांना बंद केल्याने सर्व वाहतूक वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला- लोणी – तलवाडा ते नांदगाव तालुक्यातील कासारी या मार्गाने सुरू करण्यात आली होती.

बनावट नोटा तयार करणारे तीन जणांना अंबड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मात्र तलवाडा गावाजवळील घाटात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने त्याच प्रमाणे घाटातील तीन किलोमीटर अंतर हे वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने तेथे रस्त्याची डागडुजी किंवा नवीन रस्ता तयार करण्यासाठी वन विभाग परवानगी देत नसल्याने वरील दोन्ही रस्त्याची वाहतूक कासारी येथून चांदेश्वरी घाटातून जातेगाव, बोलठाण या मार्गाने वळविण्यात आली आहे.

सटाणा: 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नवीन वाहन चालकांना या घाटातील अवघड वळण किंवा जास्तीचा असलेला उतार लक्षात येत नसल्याने या रस्त्यावर आणि चांदेश्वरी घाटात वारंवार अपघात घडत आहेत. तरी यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. वरील अपघातात सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून अपघात ग्रस्त दोन्ही वाहनांचे इंधन आणि इंजिन मधील ऑईल रस्त्यावर सांडल्याने सर्व रस्ता तेलकट झाल्याने आणखी इतर वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!