बैलांची शर्यत भवली! ग्रामपंचयतीच्या उपसरंपचासह सदस्यांवर गुन्हा दाखल
वेगवान नाशिक
इगतपुरी, ता. 28 –
नाशिक : Nashik news घोटी व बैलगाडी शर्यतीचे आयोजन करून एका प्रेक्षकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुंडेगाव येथील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध घोटी पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. Tanga Race Bhavali! A case has been filed against the members of the Gram Panchayat
भारतीय रेल्वेने चीनचा हा जागतिक विक्रम काढला मोडीत
या शर्यतीचे आयोजन मुंडेगावचे उपसरपंच हितेश बुधा हंबीर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विनायक गतीर, ऋषिकेश गतीर, सुनील गतीर, वैभव साळवे, व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी केले होते. पोलीस शिपाई सतीश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. 26) भैरवनाथ यात्रेदरम्यान घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंडेगाव शिवारातील दारणा नदीकाठी एका शेतात हा प्रकार घडला.
शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी ? काय आहे हवामान तज्ज्ञांच मत !
यावेळी पोपट कचरू मुंजे (52, रा. सारुळ, विहोळी, जिल्हा नाशिक) हा शर्यत पाहण्यासाठी आला होता. मैदान प्रेक्षक आणि बैलगाड्यांनी खचाखच भरले होते. शर्यतीदरम्यान, एक बैलगाडी धावतांना थेट गर्दीत घुसली, त्यात तीन जण जखमी झाले. गाडीच्या चाकातील लोखंडी रॉडने मुंजे यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कोणते आमदार बनले स्वतः तक्रारदार? काय आहे तक्रार?
घटनेची माहिती मिळताच घोटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला. परवानगीशिवाय बैलगाडी शर्यतींना बंदी घालणाऱ्या आदेशाचे उल्लंघन करून या शर्यती बेकायदेशीरपणे आयोजित करण्यात आल्याचे उघड झाले. यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.