नाशिक क्राईम

सिन्नर: गाडीच्या डिकीत ठेवलेले एक लाख पन्नास हजार लांबवले.


वेगवान नाशिक/भाऊसाहेब हांडोरे

शहा/२८ मे २०२४

सिन्नर येथील वाजे पेट्रोल पंपा वरून गाडीच्या डिकीत ठेवलेले एक लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज अज्ञाताने लांबविल्याची घटना २७ मे रोजी दुपारी १२:३० च्या दरम्यान घडली आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

याबाबतचे सविस्तर वृत्त असे, म्हाळु रबाजी जाधव (वय ६१) (रा.निर्हाळे,ता.सिन्नर) हे दिनांक २७ मे रोजी सकाळी साडे बारा वाजेच्या दरम्यान हाॅटेल पंचवटी व सिन्नर बसस्टँडला लागुन असलेल्या पोलीस चौकी पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या वाजे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता, घाईगडबडीचा व गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी एक लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे.

याबाबत सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञाता विरूद्ध भादंवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार माहिरे करत आहे.


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!