सिन्नरः डिकीमधून दीड लाख पळविले, बॅंक पासबुकही गेलं…
सिन्नरः डिकीमधून दीड लाख पळविले, बॅंक पासबुकही गेलं...
वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर, ता. 28 में 2024 – तालुक्यातील विविध भागात अधुनमधून होत असलेल्या चोर्यांचे सत्र सुरूच असून निर्हाळे येथील म्हाळु रबाजी जाधव वय 61 यांच्या मालकीच्या डिस्कवर मोटारसायकल च्या डिकीमधुन दीड लाख रुपयांची रोकड व भारतीय स्टेट बँकेच्या चेकबुक व पॅनकार्ड चोरट्यांनी लंपास केले आहे, रोख रक्कमेची 500/200 च्या नोटा असल्याचे त्यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करतांना त्यांनी सांगितले.
सटाना: 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
दिनांक 27 मे रोजी सकाळी साडे बारा वाजेच्या दरम्यान श्री जाधव हे हाॅटेल पंचवटी व सिन्नर बसस्टँडला लागुन असलेल्या पोलीस चौकी पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या वाजे पेट्रोल पंपावर जाधव हे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता घाईगडबडीचा व गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी 15.0000 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे.
श्री जाधव यांच्या म्हणण्यानुसार सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून वा.स्टे.डा.नं.19/2024 तर गुन्हा दाखल नोंद नंबर 436/2024 भा.द.वि.क.379 प्रमाणे पोलिस निरीक्षक श्री गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार माहिरे साहेब इतर कर्मचारी तपास करीत आहे.
भारतीय रेल्वेने चीनचा हा जागतिक विक्रम काढला मोडीत
तालुक्यातील मुसळगाव एम.आय.डि.सी .लगत असलेल्या गुळवंच येथील सुनील बाळु सानप वय – 31, यांच्या स्वताच्या मालकीच्या महिंद्रा कंपनीची बोलेरो पिक अप गाडी क्रमांक MH – 46 A .F.- 1184 उभीअसल्याल्या घरा समोरुन पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरीस गेली आहे.
भारतीय रेल्वेने चीनचा हा जागतिक विक्रम काढला मोडीत
सदर गाडीचे मालक यांची शेती असून जोडधंदा म्हणून त्यांच्याकडे सफेद रंगाची बोलेरो पिक अप गाडी होती परंतु दिनांक 27 मे रोजी पहाटे तीन वाजता चोरी गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एम,आय, डी,सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की महिंद्रा कंपनीची बोलेरो पिक अप गाडी क्रमांक एम. एच.- 46 ए.एफ.- 1184 चेसी क्रमांक MA-1, Z,N,-2 , GHKE -1,G -5,7519 तर इंजिन नंबर GHE -1,G-45254 असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एम, आय डी, पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद नंबर 236/2024, भा.द.वि.कलम – 379 दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गीते रीत आहे…
तसेच तालुक्यातील पुर्व भागातील गावं वस्त्यांमध्ये भुरट्या चोर्यांचे प्रमाण वाढले आहे.त्यामळे परिसरातील भितीचे वातावरण निर्माण झाल्याने.. पोलीसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे व तशी मागणी सर्व स्तरातुन होत आहे..