नाशिकः चेक वटला नाही म्हणून न्यायालयाने ठोठाविली ही शिक्षा
वेगवान नाशिक / wegwan nashik
नाशिक, ता. 28 में – धनादेश न वटल्याने नाशिक प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी आरोपीला एक वर्ष सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे.
बैलांची शर्यत भवली! ग्रामपंचयतीच्या उपसरंपचासह सदस्यांवर गुन्हा दाखल
घनश्याम गोविंदा दातीर असे आरोपीचे नाव आहे. तो दातीर माळा अंबड येथे राहतो. श्रीकृष्ण रामचंद्र पाचपांडे यांच्या फिर्यादीनुसार अंबड येथील फ्लॅट बाबत व्यवहार निश्चित केलेला होता. परंतु आरोपी दातीर यांनी फ्लॅटच्या व्यवहार पूर्ण केला नाही.
भारतीय रेल्वेने चीनचा हा जागतिक विक्रम काढला मोडीत
म्हणून फिर्यादी पाचपाडे यांनी व्यवहार पूर्ण करण्याच्या बदल्यात आरोपी दातीर यांना 35 लाखाचा धनादेश तीन ऑगस्ट 2019 दिला होता, मात्र हा धनादेश वाटला नाही त्यामुळे पाचपांडे यांनी याप्रकरणी नाशिक न्यायालयात धाव घेत आरोपी दातीर याच्याविरुद्ध दावा दाखल केला होता.
अंबड पोलिसांनी पाचशे रुपयांच्या एवढ्या बनावट नोटा केल्या जप्त…
या प्रकरणात दोन्ही पक्षाचे युक्तिवाद झाल्यानंतर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जी एम कोल्हापूरे यांनी आरोपी घनश्याम गोविंदाचे यांना एक वर्षाचा सश्रम करावासाची शिक्षा ठोठावली आहे