नाशिक जिल्ह्यात आयपीएल वर सट्टा ! नाशकातुन दोन तर, मुंबईतुन सहा जन अटकेत.
वेगवान नाशिक /अरुण थोरे
नाशिक/२८ मे २०२४.
नाशिक जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघा जणांना ओझर येथुन तर मुंबईतुन पाच जनांना अटक केली असून, आयपीएलवर सट्टा लावण्याची नाशिक जिल्ह्यातील पहीलीचं घटना घडल्याने, आता नाशिकही आयपीएल सट्टासाठी केंद्रस्थानी आहे की काय. असा प्रश्न निर्माण झालाय.
याबाबतची नाशिक जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा कडून मिळालेली अधिक माहिती अशी दिनांक 24 मे रोजी आयपीएल मालिकेत सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू असताना ,ओझर येथील दहावा मैल येथे एका हॉटेलमध्ये सदर सामन्यावर बेटिंग सुरू असल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार ग्रामीणचे पोलीस निरीक्षक व पथकाने तेथील हॉटेल फूडहब च्या बेटिंग सुरू असलेल्या रूममध्ये छापा टाकला असता, दोघे इसम १)भव्य चैतन्य दवे वय (२५) (राहणार दहिसर मुंबई) व २)जतीन नविन सहा (वय४१)(राहणार धोबी अली, चरई,ठाणे पश्चिम, ता.जि. ठाणे) यांना जागेवरच ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेली इसम हे ऑनलाईन पद्धतीने त्यांचे इतर साथीदारांसह वरील आयपीएल सामन्यांवर त्यांच्या जवळील मोबाईल मध्ये लोकांकडून पैसे लावून घेऊन बेकायदेशीर रित्या सट्टा खेळताना व खेळवताना आढळून आल्याने, तसेच सदर इसमांनी वरील हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी संगणमत करून त्यांचे बनावट नावाने आधार कार्ड बनवून खरे नाव असल्याचे भासवून, बनावट सिम कार्डचा वापर करून, आयपीएल सामन्यांवर बेटिंग लावण्यासाठी वेगवेगळ्या आयडी द्वारे इतर व्यक्ती सोबत बेकायदेशीर रित्या ऑनलाइन जुगार सट्टा लावून शासनाची व मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली म्हणून,
त्यांच्याविरुद्ध ओझर पोलीस ठाणे गुर नंबर १०७/२०२४ भांदवी कलम ४२०, ४६५, ४६७,४६८, ४७१, ३४ सह महाराष्ट्र जुगार कायदा कलम४ (अ)व ५ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर छाप्यात ताब्यात घेतलेले विविध कंपन्यांचे चार मोबाईल स्मार्टफोन व आयपीएल बेटिंग साठी लावण्यात आलेली अंक आकडे लिहिलेली वही, कॅल्क्युलेटर, असा २२१६०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.वरील आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले असुन, न्यायालयाने त्यांना सात दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे.
यातील आरोपींकडे वरील गुन्ह्याचे तपासात अधिक चौकशी केली असता, त्यांचे मुंबईतील इतर साथीदार नावे आरोपी ३)प्रथम राजेश सूचक (वय २३) (राहणार मुलुंड पश्चिम, मुंबई) ४ )विनोद सुभाषचंद्र गुप्ता (वय ५०) (विक्रोळी पूर्व,मुंबई) ५)रमेश श्रीगोपाळ जयस्वाल (वय ५४) (राहणार अंधेरी पश्चिम, मुंबई) ६)विशाल कीर्तीकुमार मडीया (वय४९) (राहणार मुलुंड पश्चिम,मुंबई) ७) निखिल वीरचंद विसरिया (वय ४६) ( राहणार मुलुंड पश्चिम,मुंबई) यांना देखील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजेश सुर्वे यांचे पथक करीत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात व सूचनाप्रमाणे स्थानिक गणेश गुन्हे शाखेचे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजेश सुर्वे पोउनि. दत्ता काभींरे, पोउनि. नाना शिरोळे, सहापोनि शिवाजी ठोंबरे ,पोलीस हवालदार किशोर खराटे, यांचे पथकाने सदर कारवाई केली.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.