नाशिक क्राईम

बनावट नोटा तयार करणारे तीन जणांना अंबड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बनावट नोटा तयार करणारे तीन जणांना अंबड पोलिसांनी ठोकल्या बेड्या


वेगवान नाशिक / नितिन चव्हाण :, ता,२८ मे २०२४

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या तीन इसमांना ताब्यात घेतली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्यातील संदीप भुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी अशोक अण्णा पगार (वय ४५ राहणार मेंढी सिन्नर) याने भारतीय चलनाच्या ५००रुपये किमतीच्या ३० बनावट नोटा विक्री करण्यासाठी सिडकोतील माऊली लॉन्स जगदंब वडापाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली.

त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे नकली नोटा तयार तयार करण्याचे प्रिंटर,लॅपटॉप सह मिळून आला.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

यामध्ये त्याचे साथीदार हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे, भानुदास वाघ हे मिळून आले. सिन्नर येथील एका नामांकित हॉटेलमध्ये मशीनद्वारे नोटा छापल्याची माहिती यावेळी त्यांनी पोलिसांना दिली.

यामध्ये एक आरोपी फरार असून त्याचा शोध अंबड पोलीस घेत आहे सदरची कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार,केटी रोंदळे , सागर जाधव ,राहुल जगताप , घनश्याम भोई,सुजित सिंग साळुंखे,राकेश पाटील,परदेशी,यांनी केली आहे पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!