सटाना: 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वेगवान नाशिक/आप्पा जगताप
आराई/२८ मे २०२४
सटाना तालुक्यातील अंतापुर गावानजिक शेवरे या परिसरात २० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत जायखेडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय मुरलीधर खैरणार ,व्यवसाय- शेती, राहणार सटाणा ता.सटाणा जि.नाशिक यांच्या अंतापुर येथील शेवरे शिवारातील शेतात गट नं.२०४ बांधावर असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला एक अनोळखी तरूण हरी उर्फ दिपक विठ्ठल कोरडकर (वय २० वर्षं) (रा.रायपुर ता.साक्री जि.धुळे )याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळुन आले असता खैरणार यांनी त्वरीत मोबाइलद्वारे जायखेडा पोलीसांना खबर दिली.
याबाबत जायखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूंची नोंद करणेत आली असुन ,पुढील तपास सपोनी शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पो . हवालदार जे.डी लव्हारे करीत आहे.

अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.