नाशिक क्राईम

कोणते आमदार बनले स्वतः तक्रारदार? काय आहे तक्रार?


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,27 मे 2024 –

मनमाड शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही मार्गाने फसवणूक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सदरील प्रकार हा अनेक महिन्यांपासून सुरू असल्याची शंका आहे.यामध्ये अनेक शेतकरी, नोकरदार,पेन्शनर,व्यापारी यांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

हा प्रकार लक्षात आल्यानंतर बॅंक प्रशासनाने तडकाफडकी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या करून टाकल्या. ग्राहकांच्या समोर हा प्रकार उघडकीस आल्यावर घाईघाईने बँक मॅनेजरने याविषयी विमा कंपनीचा एजंट  संदीप देशमुख याच्या विरोधात तक्रार नोंदवून या प्रकरणातून हात झटकण्यासारखा प्रकार केला.

ग्राहकांची झालेली फसवणूक व हात झटकून मोकळे होत असलेले बँक प्रशासन यामुळे आधीच दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे हतबल झालेल्या ग्राहकांनी आमदार सुहास कांदे यांच्याकडे धाव घेऊन लेखी निवेदन दिले व या सर्व अपहार,फसवणूक प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.

तालुक्याचे पालकत्व आपल्याकडे आहे.त्यामुळे  आमदार सुहास कांदे यांनी पीडित ग्राहकांच्या बैठकीत आश्वासित केल्याप्रमाणे आणि आमदार कार्यालयातील सहाय्यता कक्षात लेखी तक्रार दिलेल्या सर्व ग्राहकांच्या वतीने ग्राहक आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या सोबत मनमाड पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांचेकडे तक्रार दाखल केली.

सदरील तक्रारीत विमा एजंट संदीप देशमुख व युनियन बँक प्रशासनास दोषी मानत याची सर्व जबाबदारी ही बँक प्रशासनाची असल्याचे सांगत तक्रार दाखल केली.त्याची भरपाई देखील युनियन बँकेने करून देण्याचे आवाहनही त्यांनी बँक प्रशासनास केले आहे.

या संदर्भात 4 दिवसात बँक प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आपण स्वतः पीडित ग्राहक व शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक येथील युनियन बँकेच्या हेड ऑफिसबाहेर लोकशाही मार्गाने शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा आमदार सुहास कांदे यांनी यावेळी दिला आहे.

पोलिसांनी संदीप देशमुख आणि बँकेचे 7 कर्मचारी अशा एकूण 8 जणांविरुद्ध भादंविक 420,406, 467,468,478,120 ब,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक घुगे करत आहेत.


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!