वैतरणा नदीत बुडालेल्या त्या पर्यटकांचा शोध २४ तासानंतर नाही ……

वेगवान नाशिक/ उत्तम गायकर
इगतपुरी : वैतरणा धरणात काल १५ मित्रांच्या सोबत फिरण्यासाठी आलेल्या युवकाचा पाय घासरुन पाण्यात बुडाला होता . वैतरणा नदी बुडालेल्या पर्यटकाचा शोध युद्ध पातळीवर सुरू असुन अद्यापही शोध लागला नाही .
कोणते आमदार बनले स्वतः तक्रारदार? काय आहे तक्रार?
सदरचा पर्यटक मुफद्दल सैफउदिन हरहरवला वय ५२ सैफिल पार्क ,चर्च रोड, मरोळ अंधेरी ईस्ट मुंबई येथील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बापरे चोरट्याची एवढी हिंमत की भर दिवसा घरात घुसून….!
नदी पात्रात पाणी प्रवाह अधिक सुरू असल्याने शोध कार्यात अडथळा निर्माण होत आहे .पाणीपुरवठा काही काळामध्ये बंद करावा अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी संबधित विभागाकडे केली. मात्र पाणी बंद करण्याचे अधिकार राज्य शासनाला असल्याने अडचण निर्माण होत आहे . तरी देखील उपविभागीय अभियंता पांडव यांना विनंती केली की , पाणी बंद करावे . त्यांनी पाणी बंद करण्याची प्रक्रिया आता सुरू केली असल्याची माहिती मधे यांनी दिली.
पिंपळगाव टोल नाक्यावर बस व टँकर चा अपघात अनेक प्रवासी जखमी
घोटी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील साहेब सकाळ पासून घटनास्थळी तळ ठोकून आहेत. तसेच त्र्यंबकेश्वरक्या तहसिलदार श्वेता संचेती यांनी देखील घटना स्थळी भेट दिली.
