निफाड तालुक्यातील एकजण सुटला आग लावीत….

वेगवान नाशिक/अरुण थोरे
लासलगाव/२७ मे २०२४
मागील शेत बांधाच्या वादावरून निफाड तालुक्यातील धानोरे येथील एकाने रात्री गोठ्याला तर दुसऱ्या दिवशी दुपारी पीव्हीसी पाईप,व बांबू पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून व जालिंदर राजाराम वाटपाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिळालेली माहिती अशी, सदर तक्रारदार व संशयीत आरोपी यांच्यात न्यायालयात सामायीक शेत बांधाच्या संदर्भात वाद सुरू असुन, धानोरे तालुका निफाड येथील रहिवासी जालिंदर राजाराम वाटपाडे हे आपल्या परिवारासह शेती व्यवसाय करतात ते दिनांक 24 मे 2024 रोजी रात्री १०:३० वाजता आपल्या कुटुंबासह जेवण करत असताना त्यांच्या घराशेजारी गोठ्याच्या पाठीमागे आग लागल्याचे आढळले. म्हणून त्यांनी आपला भाऊ संजय वाटपाडे व शेजारी राहणाऱ्या शांताराम ढवळे, व दिपक गुजर आदींना आरडाओरड करून आग लागल्याचे कळवले व सर्वांनी आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना गोठ्याच्या पाठीमागून त्यांना निवृत्ती सहादू बोराडे हा पळताना दिसला.
म्हणून त्यांनी त्याचा पाठलाग केला असता तो त्याच्या घरात जाऊन लपला. फिर्यादी जालिंदर यांनी नंतर 112 या नंबर वर फोन करून पोलिसांना खबर दिली.खबर मिळताच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी व पोलीस पाटील घटनास्थळी हजर झाले. रात्रीची वेळ असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की सकाळी येऊन तुम्ही तक्रार द्या.
दुसऱ्या दिवशी तक्रारदार जालिंदर तक्रार देण्यासाठी गेले असता दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी चित्रा यांनी फोन करून सांगितले की निवृत्ती सहादू बोराडे याने पुन्हा आपल्या विहिरीजवळ असलेल्या पीव्हीसी पाईपला आग लावल्याचे सांगितले. यात पीव्हीसी पाईप, मोटार स्टार्टर, वायर तसेच गोठ्यातील फवारणी साठीचे पिस्टन मशिन नळ्या जळाल्याने निवृत्ती सहादू बोराडे याच्यावर लासलगाव पोलीसात भांदवी ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार घुमरे करत आहे.

अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.