नाशिकचे राजकारण

दिंडोरी :लोकसभा मतदारसंघ आपल्या नेत्याच काय होईल कसं होईल?

आपल्या नेत्याच काय होईल कसं होईल?


वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव

येवला ता.26मे 2024 दिंडोरी लोकसभेची निवडणूक संपून ( नऊ ) दिवस झाले असुन आता फक्त (नऊ ) दिवस मतमोजणी निकालाची प्रतीक्षा आहे.

दिंडोरी मतदार संघात प्रत्येकाला मतमोजणीच्या दिवसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे येवला तालुक्यात, शहरात, ग्रामीण भागात सध्या छोटे-मोठे कोणतेही कार्यक्रम असो किंवा भेटी गाठी असो यात फक्त एकच चर्चा ती म्हणजे कधी येणार चार जून असा सूर उमटत आहे.

चौकाचौकातील छोट्या मोठ्या समारंभासह चहाच्या हॉटेल, गावातील पार मधील चर्चेतल्या आकडेवारीत अनेकजण नवीन गणिततज्ज्ञ होऊन आकडेमोड करत आहेत.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

दिंडोरी लोकसभा निवडणुकीत चुरशीने मतदान झाले आहे. मध्यंतरी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर तसेच कांदा चा वांधा, निर्यात बंदी, निर्यात खुली आदी प्रश्न त्यामुळे मतदाराचा कौल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

दिंडोरी मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत मोठी चुरस दिसली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यानंतर, मतदान झाले मतदानानंतर विश्रांती घेतलेल्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आपल्याच उमेदवाराचे पारडे जड कसे आहे याची आकडेमोड जोरदारपणे सुरु केलेली दिसून येत आहे.

मतमोजणीला नऊ दिवसांचा अवधी असला तरी अनेकजण आकडेमोड करून अंदाज बांधत आहेत. कोण येणार कोण पडणार कोण फुटले कोणाच्या मतदार संघात किती लीड विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कोणी मदत केली यावर चर्चेचा सूर रात्री उशिरापर्यंत रंगू लागलेला आहे. यातच काही उमेदवारांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर भावी खासदारांना शुभेच्छा देत आहेत.

त्यामुळे कसं होईल काय होईल या चिंतेने अनेकांना घरच्या भाकरी गोड लागेनात. चर्चेचा फड मात्र हॉटेलच्या टेबलावर, चौकाचौकात, गावातील पारावर, सोशल मीडियावर,छोट्या मोठ्या समारंभात

उमेदवारापेक्षा कार्यकर्त्यांनाच जयपराजयाची चिंता जास्त असल्याचे   दिसून येत आहे

 

त्यामुळे एकुणच उमेदवारापेक्षा कार्यकर्त्यांनाच जयपराजयाची चिंता अधिक लागली असल्याचे चित्र दिंडोरी मतदारसंघात दिसून येत आहे.

त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात सध्या रात्रंदिवस चर्चा कधी येणार चार जून अशी आहेत मतांची आकडेमोडही सोशल मीडियावर…. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आरोग्य मंत्री भारती पवार , शिक्षक भास्कर भगरे , वंचीत च्या थावील , यांच्यात तिरंगी लढत झाली. काही अपक्ष उमेदवारदेखील रिंगणात होते मात्र खरी लढत हि तिन ऊमेदवारात होती

 

  1.  त्यामुळे या मतदारसंघात भारती पवार, भास्कर भगरे, थावील , यांना किती

मते मिळाली, कोणत्या विधानसभा मतदारसंघात

किती मताधिक्क्य मिळाले, याचीही आकडेवारी

मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत..

निवडणूक नेत्यांची पैजा कार्यकर्त्यांच्या रोख

रक्कमेसह जेवण, ओल्या-सुक्या पार्टी , ट्रीप अशा

अनेक पैजा कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या निष्ठेसाठी

लावल्या आहेत. यामुळे निवडणूक नेत्यांच्या, पैजा

कार्यकर्त्यांच्या अशी परिस्थिती ग्रामीण भागात

पाहावयास मिळत आहे.


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!