धारदार शस्त्राने चार चाकी वाहनांच्या काचा फोडून टवाळखोरांनी केली दहशत….!
धारदार शस्त्राने चार चाकी वाहनांच्या काचा फोडून टवाळखोरांनी केली दहशत....!

वेगवान नाशिक/ सिडको प्रतिनिधी ता,२६ मे २०२४
शहरात जाळ पोळीचे तसेच वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचे प्रकार सुरू असतानाच इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या स्प्लेंडर हॉलच्या बाहेर उभ्या असलेल्या पाच चाकी वाहनांची कोयत्यांनी वार करत तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस . ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शोधक पथकाने संशयित दीपक ठोंबरे यास अटक केली आहे.
दिवसांपूर्वी समाजकंटकांनी जुन्या नाशकातील गाड्या फोडण्याची घटना ताजी
असतानाच शनिवारी (दि. २५) पुन्हा ही घटना घडली. स्पेंडर हॉल येथे विवाह कार्यक्रम होता. त्यासाठी आलेल्या वऱ्हाडींनी आपली वाहने हॉलच्या बाहेर लावली होती.
अचानक रात्री सव्वानऊ वाजेचा सुमारास संशयित हातात कोयता घेऊन पाच चार चाकी वाहनांची तोडफोड करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर तातडीने गुन्हे शोधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भूषण सोनार, सौरभ माळी, प्रकाश नागरे, जयलाल राठोड, यांनी घटनास्थळी जाऊन संशयित दीपक ठोंबरे (३६, भगतसिंग वसाहत) या आरोपीस अटक केली आहे
