नाशिक शहर
पिंपळगाव टोल नाक्यावर बस व टँकर चा अपघात अनेक प्रवासी जखमी
पिंपळगाव टोल नाक्यावर बस व टँकर चा अपघात अनेक प्रवासी जखमी
वेगवान नाशिक/ प्रतिनिधी नितीन चव्हाण ता :,२६ मे २०२४
पिंपळगाव टोल नाक्यावर टँकरला एसटी महामंडळाची धडक अनेक प्रवासी जखमी सविस्तर माहिती अशी की टँकर क्रमांक एम एच 19 सी वाय 93 40 हा टँकर टोल नाक्यावर टोल भरत असताना मागून येऊन चाळीसगाव हुन कल्याण कडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिली.
या धडकेत बसचे नुकसान झाले आहे. या बस मध्ये अनेक प्रवासी प्रवास करत असताना ही घटना घडली प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू होते.
ही घटना रविवारी दुपारी तीन ते साडेतीन च्या दरम्यान घडली असून पुढील तपासासाठी पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले होते