नाशिक शहर

अखेर तो बार बंद महिलांच्या आंदोलनाला यश….

अखेर तो बार बंद महिलांच्या आंदोलनाला यश....


वेगवान नाशिक/ प्रतिनिधी नितिन चव्हाण ता,२६ मे २०२४

पाथर्डी फाटा, येथील गुलमोहरनगर येथे रहिवासी इमातरीततील , बारला ४०० रहिवाशांनी विरोध केला होता .

काही दिवसांपूर्वीच देवीची आरती करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले होते.

त्यानंतर २ दिवस बार बंद होता. आता पुन्हा बार सुरू झाला महिलांनी पुन्हा या बारपुढे ठिय्या आंदोलनच केले होते .

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

त्यानंतर रास्ता रोको करण्याचा इशारा श्रुती नाईक व महिलांनी दिला होता रहिवासी इमातरीच्या एका गाळ्यात रेस्टोबार सुरू केल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले होते .

त्यानंतर श्रुती नाईक यांनी अनेक महिलांसह पोलीस आयुक्तालय इंदिरानगर पोलीस स्टेशन जिल्हाधिकारी कार्यालय उत्पादन शुल्क विभाग या ठिकाणी पत्रव्यवहार केला या पत्र व्यवहाराची व आंदोलनाची दखल घेत अखेर तो बार बंद पडला.

आभार तात्पुरत्या स्वरूपात बंद केला गेल्याचे स्थानिकांनी यावेळी सांगितले आभार कायमस्वरूपी बंद करावा व टवाळखोर तसेच मद्यपीनवर आळा घालावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!