नाशिक ग्रामीण

लढ पठ्या लढ ! तांबड्या मातीतील रांगड्या पैलवानांचा रंगला कुस्तीचा फड !


वेगवान नाशिक / उत्तम गायकर  इगतपुरी : दि. २५ . इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव हे कीर्तनकार व पहिलवान व बैलगाडा शौकिनांच गाव म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे . त्याबरोबरच राजकीय पटलावर उभ्या महाराष्ट्रात प्रथमत:च ग्रामपंचायत सदस्यांना हेलिकॉप्टर वारी घडविणारे मुंढेगावचे हायटेक सरपंच चंद्रकांत गतीर यांचं गाव म्हणूनही गवगवा असणाऱ्या गावची जत्रा ही तशीच गावाचं वैभव आणि नावलौकिक वाढविणारी नसेल तर नवलच म्हणावं लागेल .

ग्रामदैवत हनुमंतरायाच्या भजन कीर्तनादी कार्यक्रमाबरोबरच तमाशा , कुस्तीचा आखाडा , आणि बैलगाडा शर्यत अशा अनुषंगाने ही यात्रा भरत असते . आजच्या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन उपजिल्हाप्रमुख तथा तालीम संघाचे मा अध्यक्ष निवृत्ती जाधव यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.

भक्ती, शक्ती ,युक्तीचा त्रिवेणी संगम म्हणजे कुस्ती ! मुंढेगाव येथे कुस्त्यांचे हनुमान यात्रा उत्सव निमित्त कुस्त्यांचे नियोजन केले होते .या वेळी अनेक नामांकित पहिलवानानी हजेरी लावली होती .सांजेगाव , मुरंबी, बलायदुरी , घोटी ,नाशिक ,रावतमाळ, जुन्नर , कर्जत ठिकाणचे अनेक पहिलवान हजर होते

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

यावेळी एक आकर्षक कुस्ती झाली . साकुर. फाट्याचे पैलवान रोशन मोहिते अन् घोटीचे पहिलवान शरद घारे या कुस्तीत पे . रोशन मोहिते टांग डावावर विजयी झाला .वसुंधरा मुकणे , तनुजा शिंदे, प्रतिक्षा राव ,चैताली वेल्हाळ,दिपाली सेने . माया जाधव या महिला कुस्तीगीर मुंढेगाव येथील कुस्ती आखाड्याच्या आकर्षण ठरल्या !

प्रेक्षकांनी पैलवानांवर बक्षीसांचा वर्षाव करीत कौतुक केलं.अतिशय सुंदर शैलीतील,समर्पक, रोमहर्षक निवेदन किरण मते यांनी केल्याने उपस्थितांकडून मोठ्या प्रमाणात बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला .

यावेळी पं.स.सभापती विठ्ठल लंगडे, विद्यमान सरपंच विनायक गतीर, पो.पा. गणपत जाधव, भरत म.गतीर, भगवान म.गतीर ,बाळू म.गतीर, कार्तिक गतीर, राजु गतीर, गोविंद गतीर, जालिंदर गतीर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!