शेती

चांदवडः टॅंकरवर जेवढा पैसा खर्च झाला; तेवढ्यात धरणाची निर्मीती


वेगवान नाशिक  / विजय काळे 

रेडगांव खुर्द दि 25 – 1974 ला चांदवडला भीषण दुष्काळ पडला होता. त्याच परिस्थितीची विदारकता आज चांदवडची जनता सहन करत आहे. गत पावसाळ्यात जमिनीत बैलाच्या उमटलेल्या पावलामध्ये पाणी साचेल इतका सुद्धा पाऊस चांदवडला झाला नाही. त्यामुळे पावसाळ्यापासूनच सर्व नदी नाले बंधारे विहिरी कोरड्याठाक आहे.

लढ पठ्या लढ ! तांबड्या मातीतील रांगड्या पैलवानांचा रंगला कुस्तीचा फड !

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

चांदवडला पाणीपुरवठा करणाऱ्या ओझरखेड धरणाचा पाणीसाठा पूर्णपणे तळाला गेल्याने 44 गाव पाणीपुरवठा योजना धोक्यात सापडली आहे. जॅकवेलमध्ये पाणीच येत नसल्याने एक पंप बंद झाला. एकच पंप कसाबसा चालू असल्याने पाईपलाईन मध्ये पाण्याचा प्रेशर येत नाही. त्यामुळे पाणी पुढे जात नसल्याने या योजनेवर अवलंबून असलेल्या चांदवडसह 70 ते 80 गावांचा पाणीपुरवठा डेंजर झोन मध्ये आल्याने चांदवडकरांना वेळेला आलेला मान्सूनच तारेल, अन्यथा पुढे काय होईल हे सांगणे कठीण.

वृद्धास दमदाटी करून 50 लाखाची मागणी

आज रोजी तालुक्याला 29 गावे आणि 97 वाडीवस्त्यांसाठी शासकीय टँकर दोन आणि खाजगी 31 टँकरने 90 फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा होत आहे. 44 गाव योजनेतून 15 ते 20 दिवसाआड 62 गावे आणि 30 वाडीवस्त्यांना पाणीपुरवठा होतो. तर नगर परिषदेच्या जलकुंभातून 14 ते 15 टँकर, जीवन प्राधिकरणाच्या जलकुंभातून 30 टॅंकर आणि उर्वरित 25 ते 27 टँकर निफाड तालुक्यातील कातरगाव येथील अधिग्रहित सार्वजनिक विहिरीतून, तर काही टँकर सुंदरपूर येथील खाजगी विहिरीतून भरून आणले जातात. खाजगी विहीर मालकाला दैनंदिन सहाशे रुपये द्यावे लागतात.

पुणेगाव कालव्याच्या मार्गाबाबत आज शेवटी निर्णय झाला !

टँकर सुरू झाल्यापासून आज रोजी पर्यंत इंधन आणि भाड्यापोटी अंदाजे दीड ते दोन कोटी रुपये खर्च झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. अजून एक दीड महिना असेच चित्र राहिले तर अजून 50 लाख रुपये खर्च होणार असल्याने अडीच कोटी पर्यंत हा आकडा जाणार आहे. एवढ्या पैशात एखादे धरण झाले असते, किंवा एखादी छोटी मोठी जलवाहिनी झाली असती.

बापरे.. एक नाही दोन नाही चक्क चार बिबट्यांचे नाशिकच्या या भागात दर्शन

पण लक्षात कोण घेतं? मान्सूनचे आगमनास अजून वेळ असल्याने पाणीटंचाई उग्ररूप धारण करेल. माणसांना पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांना तर पोटभर पाणी मिळतच नाही. घाणेरड्या पाण्यावर मुक्या जित्राबांना अर्धवट तहान भागवावी लागते. पाण्याअभावी अनेकांनी आपली जनावरे बाजारात मिळेल त्या भावात विकून टाकली. चांदवडच्या पूर्व भागात सर्वाधिक पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. त्यांच्या हालअपेष्ठा शब्दात मांडणे कठीण आहे. “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” परदुख शितळ असते ते सांगून कळणार नाही.

 

कासलीवालांची पुण्याई आड आली

चांदवडचे दिवंगत आमदार जयचंदजी कासलीवाल यांनी त्यांच्या कार्यकाळात दुष्काळी चांदवडचे चित्र पाहता ओझरखेड धरणावरून 1995 मध्ये दोन टप्प्यात 50 कोटी रुपये खर्चून छत्तीस गाव पाणीपुरवठा योजना आणली. आज त्याच योजनेवर 70 गावे आपली तहान भागवत आहे. तर त्यांचे पुत्र भूषण कासलीवाल यांनी नगराध्यक्ष असताना स्वतंत्र चांदवड शहरासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून 72 कोटी रुपये खर्चून स्वतंत्र पाईपलाईन आणली. या दोन्ही योजना आज आल्या नसत्या तर चांदवडचे प्रचंड हाल झाले असते. चांदवड तालुक्यासाठी कासलीवाल पिता पुत्र भगीरथ ठरले असेच म्हणावे लागेल.

 

 

तीस किलोमीटरवर पाणीच पाणी

चांदवडला जेव्हा जेव्हा दुष्काळ पडून टॅंकरने पाणी आणण्याची वेळ येते. तेव्हा निफाड मधील नांदूर मधमेश्वर धरणा जवळील शिवरे कातरगाव आदी परिसरातून पिण्याचे पाणी आणावे लागते. वास्तविक नांदूर मधमेश्वर धरण आणि चांदवड मधील दरसवाडी धरण यामधील अंतर फक्त तीस किलोमीटर आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून कालवा अथवा उपसा सिंचन योजना पद्धत राबवून पाणी आणणे फार खर्चिक नाही. या ठिकाणी कायम पाणी असते. चांदवडला दुष्काळी परिस्थितीत याचा मोठा उपयोग होऊ शकतो. मात्र यासाठी राजकीय प्रबळ इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे.

 

“ओझरखेड धरणातील जॅकवेलमध्ये पाणीच येत नाही. आठ दिवसांपूर्वी पोकलेन मशीनने चर घेतला होता. परंतु पाणी पातळी पुन्हा कमी झाली. आज मनुष्यबळाच्या सहाय्याने खोदकाम केले. सोमवारी थेट धरणातच मोटारी टाकाव्या लागतील. तेव्हाच पाणी उपलब्ध होईल.”
मनोहर बिरारी – मजिप्र कनिष्ठ अभियंता चांदवड

फोटो १) ओझरखेड धरणाचा आटलेला पाणीसाठा
२) ओझरखेड धरणात मनुष्यबळाचे सहाय्याने सूरु असलेले खोदकाम
३) वडगांव रापली येथे आदीवासी कुटुंब लहान पोरंसोरं उन्हातान्हात टॅकरची वाट पाहताना


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!