पुणेगाव कालव्याच्या मार्गाबाबत आज शेवटी निर्णय झाला !

वेगवान नाशिक / विजय काळे
रेडगाव खु, ता. 24 – पुणेगांव दरसवाडी कालवा दरम्यान पाटबंधारे विभागाने भाटगाव (ता चांदवड) गावाच्या नदीवर किमी 60 मध्ये सिमेंट मोरी पाईप टाकून पाणी थेट दरसवाडी धरणात टाकण्याचे नियोजन केले असता, काल दि 23 रोजी परसुल भोयेगाव उर्धुळ येथील शेतकऱ्यांनी कालवा दुरुस्तीचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता.
तुमच्या कष्टाचा एक रुपयाही बुडू देणार नाही,आमदार कांदे यांनी दिला शब्द
सदरचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ आज दि 24 रोजी नांदूर मधमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता आणि तालुक्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी ग्रामस्थांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पूर्वीप्रमाणेच पुणेगावचे पाणी 63 किमी पासून पुढे परसुल नदी मधून दरसवाडी धरणात जाईल. याबाबतचे लेखी आश्वासन आम्ही लवकरच आमदार डॉ. राहुल आहेर आणि ग्रामस्थांना देऊ असे आश्वासन पाटबंधारे विभागाने दिल्याने वादावर तुर्त पडदा पडला.
बागलाणः ट्रॅक अपघातामध्ये तीन ठार, पाच जण जखमी
पुणेगावचे पाणी येवल्याला नेण्यासाठी मंत्री छगन भुजबळ कसोशीने प्रयत्न करीत आहे. सध्या या कालव्याचे अस्तरीकरण आणि विस्तारीकरणाचे काम जोरात चालू आहे. पाटबंधारे विभागाने भाटगाव ता चांदवड येथे किमी 60 मध्ये येथील नदीवर सिमेंट मो-या पाईप टाकून गेटचे नियोजन केल्याने पुढील 61 किमी ते 63 किमी असा तीन किमी कालवा तसेच पुढील नदीपात्रातील मार्गक्रमण करणारा मार्ग असा अंदाजे पाच कि.मी परिसर पाण्यापासून वंचित राहणार होता. भाटगाव ते थेट दरसवाडी धरणात पाणी टाकण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले असावे. अशा शक्यतेने परसुल भोयेगाव उर्धुळ या गावांच्या शेतकऱ्यांमध्ये चलबिचल झाली.
असा आहे महाराष्ट्र विधान परिषदेसाठीच्या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम
आणि कालव्याचा मार्ग बदलला जाणार या भावनेने काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या या तक्रारीची तात्काळ दखल घेत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलीच विचारणा केली. तसेच या ठिकाणी गेट टाकण्याचे प्रयोजन काय? असे विचारले असता अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कालव्याच्या पाण्यामुळे फुगवटा निर्माण होऊन धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये कालव्यामधील अतिरिक्त पाणी बाहेर सोडण्यासाठी गेटची निर्मिती केल्याचे सांगून कालव्याचा प्रवाह आम्ही बदलणार नाही. असे लेखी देऊ असे सांगितल्याने वाद मिटला. यावेळी कालवा कृती समितीचे अध्यक्ष तुकाराम सोनवणे भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे योगेश ढोमसे दिगंबर वाघ पिंटू भोईटे किरण सोनवणे समाधान पवार आर के मामा भागवत जाधव ज्ञानेश्वर शिंदे नवनाथ पोटे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडोरीची आकडेमोड रात्रभर सुरु ..कधी भारती पवार तर कधी भास्कर भगरे
अडीचशे कोटींचा निधी तरीही कालव्याला फुगवटा?
पुणेगाव ते दरसवाडी या 63 किमी मधील विस्तारीकरण, अस्तरीकरण, पुल, गेट, संरक्षक भिंत, लेव्हलिंग या कामासाठी 96 कोटी तर दरसवाडी ते डोंगरगाव या 87 किमी मधील विस्तारीकरण, कॉंक्रिटीकरण, लेव्हलिंग गेट, पूल या सर्व कामांसाठी 146 कोटी असा 242 कोटींचा निधी नव्याने मंजूर झाला आहे. असे असतानाही अधिकाऱ्यांकडून कालव्यामध्ये काही ठिकाणी पाणी फुगवटा होऊ शकतो? अशी विधाने ते उपस्थित जनतेपुढे राजरोसपणे करीत असल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कालव्याचे पाणी शेवटपर्यंत जाण्यासाठी विस्तारीकरण कॉंक्रिटीकरण लेव्हलिंग यासाठी भरपूर निधी मंजूर असताना कालव्यामध्ये फुगवटा कसा निर्माण होऊ शकतो? ही बाब सर्वसामान्यांना बुचकळ्यात टाकणारी आहे.
प्रतिक्रिया
“पुणेगाव कालव्याचा मार्ग कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. पूर्वीप्रमाणेच कालव्याचे पाणी दरसवाडी धरणात जाईल. अतिरिक्त पाण्याच्या विसर्गासाठी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी गेट असल्याचे नमूद केले”.डॉ राहुल आहेर – आमदार चांदवड देवळा
