बागलाणः ट्रॅक अपघातामध्ये तीन ठार, पाच जण जखमी
बागलाणः ट्रॅक अपघातामध्ये तीन ठार, पाच जण जखमी

वेगवान नाशिक / अतुल सुर्यवंशी
सटाणा, ता .24 में 2024-
निफाड तालुक्यात पोलिसाला पाच हजाराची लाच घेताना अटक.
शुक्रवारी (दि. 24) गुजरातमधील बारडोली शहराजवळ मालवाहू ट्रकला झालेल्या भीषण अपघातात खमताणे (ता. बागलाण) येथील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.Three killed in track accident in Baglan taluk
असा आहे महाराष्ट्र विधान परिषदेसाठीच्या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम
बागलाण तालुक्यातील खमताणे येथील छाटणी कामगार डाळिंब छाटणीसाठी वीरगाव येथून भाजीपाला घेऊन ट्रकने सुरतला जात होते. बारडोलीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. पिंटू पिराजी पवार (वय 40), सोनू एकनाथ मोरे (वय 35), भाऊसाहेब प्रताप बागुल (वय 50, सर्व रा. खमताणे) यांचा जागीच मृत्यू झाला.
संशयित आरोपी संदीप देशमुखच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
या अपघातात बाबाजी कडू पवार, भाऊसाहेब हिरामण पवार, आकाश माळी, तुळशीराम सोनवणे (शेष तळवडे), दादा केरसाणेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गौळणे येथील भंगार गोदामाला आग…! एवढ्या लाखांचे झाले नुकसान
अपघातस्थळी उपस्थित बागलाण येथील ट्रक चालकाने आमदार दिलीप बोरसे यांना माहिती देऊन मदत मागितली. आमदार बोरसे यांनी तात्काळ बारडोलीचे आमदार ईश्वरभाई परमार यांच्याशी संपर्क साधून बागलाण तालुक्यातील पीडितांना मदतीची विनंती केली.
निफाड तालुक्यात पोलिसाला पाच हजाराची लाच घेताना अटक.
.
