नाशिक शहर
बारावीत कमी गुण मिळाल्याने सिडकोतील युवकाने उचलले टोकाचे पाऊल….!
बारावीत कमी गुण मिळाल्याने सिडकोतील युवकाने उचलले टोकाचे पाऊल....!

वेगवान नाशिक /सिडको प्रतिनिधी ता :,२४ मे २०२४
बारावीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने तणावात येत एका १८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिवपुरी चौकात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष गुलाब पाटील (१८,रा.उत्तम नगर शिवपुरी चौक नवीन नाशिक) याचा बारावीचा निकाल लागला त्यामध्ये त्याला हवे तसे गुण न मिळाल्याने तो तणावात गेला होता.
याच दरम्यान (दि. २३) रात्री पावणे आठ वाजेच्या पूर्वी घरात कोणी नसताना त्याने किचन मधील सिलिंगच्या छताला सुतीदोरी बांधून तिच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
याप्रकरणी पियुषचे काका ज्ञानेश्वर आधार पाटील (३९) यांनी अंबड पोलिसांना कळविले. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आवारे करीत आहेत.
