रेस्टॉरंट बार बंद करण्यासाठी महिलांनी बारपुढे बसून काय केले पहा
रेस्टॉरंट बार बंद करण्यासाठी महिलांनी बारपुढे बसून काय केले पहा

वेगवान नाशिक /प्रतिनिधी:, नितिन चव्हाण ता:, २४ मे २०२४
पाथर्डी फाटा गुलमोहर नगर या रहिवाशी भागातील बार,रेस्टॉरंट याला 400 रहिवाशाचा लेखी विरोध असताना कोणीच त्याची दखल घेत नसल्याने पुन्हा गांधीगिरी पद्धतीने देवीची आरती करून आंदोलन छेडण्यात आले.
दोन दिवसात बार. बंद झाला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा रहिवाशानि इशारा दिला.
संदर्भात श्रुती नाईक या रहिवासी महिलेने पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय,पोलिस आयुक्तालय ,नाशिक, इंदिरानगर पोलीस स्टेशन, महानगरपालिका आयुक्त नाशिक,राज्य व शुल्क कर विभाग येथील सगळ्या अधिकारी यांना लेखी निवेदन दिले.
याची कोणीच दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या महिला रहिवाशांनी गणपती,दुर्गेची आरती करत गांधीगिरी पद्धतीचे आंदोलन केले.
बार मालकीण लता कमोद याच्या मुलाला शांततेने समजाऊन सांगूनही हा बार चालू कसा होतो. बार सुरू करताना रहिवाशांची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नसताना बार सुरू करू नये आसा लेखी विरोधआहे.
