नाशिक क्राईम

निफाड तालुक्यात पोलिसाला पाच हजाराची लाच घेताना अटक.


वेगवान नाशिक:

निफाड तालुक्यातील लासलगाव येथील पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचाऱ्याला पाच हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून, कैलास सदाशिव बिडगर, (वय ४२) वर्षे पोलीस नाईक नेमनुक लासलगाव पोलीस स्टेशन असे कर्मचार्याचे नाव आहे.

 

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

यातील तक्रारदार हे डोंगरगाव तालुका निफाड येथील रहिवासी असून ते व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांच्याविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 18 मे 2024 रोजी भांदवी कलम 324, 504, 506 ,प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून, आरोपी लोकसेवक हे सदर गुन्हाचे तपासी अधिकारी आहेत.

या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करता कोर्टात पाठवून मदत करण्यासाठी, आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडी अंती पाच हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती पंचांसमक्ष स्वीकारली म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला.


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!