नाशिकचे राजकारण

दिंडोरीची आकडेमोड रात्रभर सुरु ..कधी भारती पवार तर कधी भास्कर भगरे

दिंडोरीची आकडेमोड रात्रभर सुरु ..कधी भारती पवार तर कधी भास्कर भगरे


वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव 

येवला, ता. 24 – लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतदान होण्याचा मान दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला मिळाला. मतदानाची ही वाढती टक्केवारी नेमकी कुणाच्या पथ्यावर पडते, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. मात्र, गावोगावी कट्ट्यावर कोण निवडून येणार यावर जोरदार चर्चा रंगत आहेत.

पुणेगाव दरसवाडी कालव्याचा मार्ग बदलला ! चांदवड मात्र उपाशी येवला तुपाशी (व्हिडीओ)

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शेतकरी, शेतमजूर मतदारांची संख्या मोठी आहे. मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात होते. मात्र, जिवा पांडू गावित यांच्या माघारीनंतर मुख्य लढत ही महायुतीच्या डॉ. भारती पवार विरुद्ध महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यातच झाली. मोठ्या उत्साहाने उतरलेले जिवा पांडू गावित यांनी माघार घेतली. यासाठी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांची शिष्टाई सफल झाल्याचे बोलले जाते. त्याचा फायदा भास्कर भगरेंना होईल, असे वाटते.

बॅंकेतील एफड्या खोट्या! लोकांच्या खात्यावरील एफड्या झाल्या रिकाम्या ?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह जनतेपर्यंत पोचवण्याचे मोठे आव्हान भगरे यांच्यासमोर होते, तर डॉ. भारती पवार यांना मिळालेले ‘कमळ’ चिन्ह जनतेला अवगत होते. त्यातच डॉ. पवार यांनी शेवटपर्यंत प्रचारात आघाडीही घेतली. मात्र, दिंडोरी मतदारसंघात शेतकरी वर्गाने निवडणूक ताब्यात घेतली. निवडणुकीत कांदा, टोमॅटो, द्राक्षप्रश्न गाजला. कोरोना काळापासून द्राक्षाला मातीमोल भाव, केंद्र सरकारचे चुकीचे आयात-निर्यात धोरण, वारंवार कांदा पिकावर निर्यातबंदी, आयात शुल्क वाढवणे, नाफेडच्या कांदा खरेदीत गौडबंगाल यामुळे कांदा उत्पादक हैराण झाला होता.

भाजपा बद्दल नाशिक महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील केदार काय म्हणताय…पहा

वारंवार बाजार समित्या बंद राहणे, शेतकरी, व्यापारी आंदोलनाला किंमत न देणे या केंद्राच्या धोरणामुळे मतदारसंघात केंद्र सरकारच्या अर्थात भाजपविरोधात नाराजीची सुप्त लाट निर्माण झाली होती. डॉ. भारती पवार सक्रिय खासदार असूनही त्यांना केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणाचा फटका बसत असल्याचा अहवाल गेल्याने केंद्राने तातडीने निर्यातबंदी उठवली. त्यामुळे कांद्याचे भाव १३०० वरून २५०० रुपये झाले. मात्र, दोनच दिवसांत कांद्याचे भाव पुन्हा जैसे थे झाले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला व निवडणूक भाजपच्या हाताबाहेर गेली.

बॅंकेतील एफड्या खोट्या! लोकांच्या खात्यावरील एफड्या झाल्या रिकाम्या ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दिंडोरी मतदारसंघात सभा घेतल्या. मात्र, पिंपळगाव येथे झालेल्या सभेत खुद्द मोदींनाच कांदा उत्पादकांच्या नाराजीचा सामना करावा लागला. सभेअगोदर शेतकरी संघटनेच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यामुळे त्याचाही मतदारसंघात नकारात्मक संदेश गेला. त्यामुळे भगरे यांना मोठा जनाधार मिळू लागला. विशेष म्हणजे, भगरे यांचे कोणत्याही कांदा आंदोलनात योगदान नाही.

मात्र, डॉ. भारती पवार निवडून गेल्या तर कांदा उत्पादक नाराज नाही, हा संदेश केंद्रात जायला नको. त्यामुळे मतदारांनी आपला कल भास्कर भगरे यांना द्यायला सुरुवात केली. निवडणुकीत प्रचंड चुरस बघायला मिळाली. शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ चर्चिले गेले असे नाही, तर त्या मुद्द्यांवर मतदान होताना दिसले.

मतदारांनी ठिकठिकाणी कांदा व टोमॅटोच्या माळा गळ्यात घालून मतदान केले. प्रत्येक लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा सत्ताधारी लोकप्रतिनिधींना या निवडणुकीत प्रचार काळात जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, हा संदेश गेला आहे. डॉ. पवार यांची मित्रपक्षांच्या ज्या आमदारांवर भिस्त आहे, त्यांच्यात उफाळलेले मतभेद त्रासदायक ठरत आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरझरी झिरवाळ हे भगरे यांच्या प्रचारार्थ बैठकीत सहभागी झाल्याचे उघड झाल्याने पंचाईत झालेल्या झिरवाळ व अजित पवार गटाला

सारवासारव करावी लागली. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी विरोधकांचा प्रचार करत असल्याची तोफ डागली. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. मंत्री छगन भुजबळ यांनी येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात

केलेल्या विकासकामांमुळे मतदारसंघावरील चांगली पकड असल्याने व त्यातच ते महायुतीचे घटक असल्याने येवला मतदारसंघात डॉ. पवार यांना मताधिक्य मिळावे, असा अंदाज आहे.


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!