नाशिक क्राईम

कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या :,गाय सह टेम्पो पोलिसांच्या ताब्यात युनिट २ ची कारवाई..!

कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या :,गाय सह टेम्पो पोलिसांच्या ताब्यात युनिट २ ची कारवाई..!


वेगवान नाशिक /सिडको प्रतिनिधी ता :,२४ मे २०२४

गेल्या काही दिवसांपूर्वी युनिट दोनच्या पथकाने नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात मोठा कत्तलखाना उध्वस्त केला.

त्या कारवाईमध्ये अनेक जिवंत गाई मिळून आल्या महाराष्ट्रात गोहत्या बंद असताना देखील कत्तलीसाठी गाय घेऊन जाणारा एका इसमा सह टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे.

पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंबड लिंक रोड वरील छत्रपती चौक येथून एका महिंद्रा कंपनीची मॅक्सिमो पिकअप गाडीमध्ये कत्तलीसाठी गाय घेऊन जाणार असल्याची माहिती मिळालीअसता घुमरे यांनी सापळा रचला.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

व गाडी क्रमांक एम एच १५ सीके ९५१९ या गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये एक गाय आढळून आली.

मशीद कुरेशी (वय ४३) रा,वडाळा गाव सादिक नगर याची चौकशी केली असता त्याने गाडीमध्ये असलेली गाय कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली त्याच्याकडून १,७०,००० मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई युनिट दोन चे वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो हा, चंद्रकांत गवळी, सुनील आहेर,अतुल पाटील,प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण,गुलाब सोनार,विशाल पाटील, पो अं, स्वप्निल जुंद्रे, तेजस मते,प्रवीण वानखेडे,यांनी केली आहे पुढील कारवाईसाठी आरोपीस सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!