वेगवान नाशिक / विजय काळे
चांदवड, ता .23 में 2024 – येवला तालुक्यांसाठी बहुचर्चित पुणेगांव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे विस्तारीकरण आणि अस्तरीकरणाचे काम मोठ्या वेगात चालू आहे.
बापरे.. एक नाही दोन नाही चक्क चार बिबट्यांचे नाशिकच्या या भागात दर्शन
या कामासाठी शेकडो कोटींचा निधी मंजूर झाला असून येवल्याला पाणी नेण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये चांदवडची जनता पाण्याविना उपाशीच राहणार असल्याचे चित्र पुढे आले आहे.
https://wegwanmarathi.com/2024/05/23/will-the-pm-kisan-pension-for-farmers-be-stopped/
पुणेगाव कालव्याचे पाणी 63 किमी पर्यंत आल्यानंतर ते परसुल नाल्यात टाकून पुढे ते भोयेगाव पासून दरसवाडी धरणात पोहोचते. असे आजवरचे नियोजन होते. या मार्गाप्रमाणेच पाणी दरसवाडी धरणात येत होते. परंतु सध्या चालू असलेल्या अस्तरीकरणाच्या कामांमध्ये हे पाणी 63 किमी नंतर परसुल नाल्यात न टाकता भाटगाव मार्गे थेट दरसवाडी धरणात टाकण्याची नियोजन चालू असल्याचे समजते.
बॅंकेतील एफड्या खोट्या! लोकांच्या खात्यावरील एफड्या झाल्या रिकाम्या ?
भाटगाव येथे यासाठी मोठमोठे सिमेंट पाईप टाकून हे पाणी थेट दरसवाडी धरणात वळवले जाणार आहे. यामुळे परसुल भोयेगाव या गावांना यापुढे पुणेगावचे पाणी मिळणार नसल्याने येथील जनता आक्रमक झाली असून काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र ठेकेदार अधिकारी आणि प्रशासन याच मार्गाने पाणी नेण्यासाठी ठाम असल्याने वादाची ठिणगी पडली आहे.
नाशिक जिल्ह्यातील या बंधाऱ्यात आज पुन्हा दोन जण बुडाले
उद्या या विषयावर या भागातील आक्रमक जनता संबंधित विभागाचे अधिकारी आणि तालुक्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या समवेत एक बैठक आयोजित केल्याची माहिती समोर आली असून या बैठकीनंतरच पाण्याचा मार्ग नेमका कोणता हे निश्चित होणार आहे. पाण्याचा मार्ग बदलविल्यास चांदवड तालुक्यात पुणेगाव दरसवाडीचा प्रश्न पेटल्याशिवाय राहणार नाही.