नाशिक शहरनाशिकचे राजकारण

भाजपा बद्दल नाशिक महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील केदार काय म्हणताय…पहा

भाजप विरोधकांचे आरोप.......


रिझर्व बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला विक्रमी २.११ लाख कोटी लाभांश दिला.

भाजप विरोधकांचे आरोप तथ्यहीन व बिनबुडाचे.- सुनिल केदार.

Wegwan news/ wegwan news 

 नाशिक-  रिझर्व बँक ऑफ इंडियाने यावर्षी केंद्र सरकारला २,१०,८७४ लाख कोटी लाभांश दिला आहे.विरोधक ओरड करत होते की रिझर्व बँकेच्या राखीव निधीचासुध्दा मोदी सरकारने गैरवापर केला.जर असे असते तर या बँकेने आजपर्यंतच्या इतिहासातील उच्चांकी लाभांश केंद्र सरकारला दिला असता का ? विरोधकांनी दोन कोटी दहा लाख आठशे चौऱ्याहत्तर लाख कोटी अंकी लिहून दाखवावे असे आवाहन भाजप नाशिक महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील केदार यांनी केले आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताची अर्थव्यवस्था ६ व्या स्थानावर होती.काँग्रेस काळात अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावर गेली होती.२०१४ ते २०२४ या मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आली हा जागतिक उच्चांक आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

जर मोदी सरकारने रिझर्व बँकेच्या निधीचा गैरवापर केला असता तर रिझर्व बँकेने उच्चांकी २.११ लाख कोटी लाभांश केंद्र सरकारला दिला असता का ? याचे उत्तर विरोधकांनी द्यावे असे केदार यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!