तुझा मुलगा कुठयं? मला त्याचा मर्डर करायचायं !

वेगवान नाशिक / अरुण थोरे
निफाड , ता. २२ मे २०२४
तुझा मुलगा मोसीन कुठे आहे ? मला त्याचा मर्डर करायचा आहे.त्याच्या रक्ताने मला वाढदिवस साजरा करायचा आहे. असे म्हणत निफाड शहरातील गणेश नगरभागात एकाने धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे.
वणी बस स्थानकात पेटली महामंडळाची बस
याबाबत निफाड शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी फिर्यादी अकीला हारुन शेख (वय ५५) (गणेशनगर निफाड) व तिची सून घरी असताना दिनांक २१ मे २०२४ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सोन्या मोकाणे ( राहणार निफाड) (पूर्ण नाव माहित नाही) हा फिर्यादीच्या घरात घुसला व तुझा मुलगा मोसिन कुठे आहे?
नाशिकः महिलेचा अंघोळ करतानाचं व्हिडीओ मोबाईल मध्ये शुट
मला त्याचा मर्डर करायचा आहे व त्याच्या रक्ताने मला माझा वाढदिवस साजरा करायचा आहे.असं म्हणत घरातील बेडरूम मध्ये असलेला टीव्ही हाताच्या बुक्याने फोडून टाकला व बेडरूम मध्ये असलेल्या भिंतीमधील कपाटाच्या लाकडी दरवाजावर हाताच्या सहाय्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.
नाशिकः महिलेचा अंघोळ करतानाचं व्हिडीओ मोबाईल मध्ये शुट
फिर्यादी त्याला आवरण्यासाठी गेले असता आरोपीताने त्यांना वाईट साईट शिवीगाळ करून त्यांच्या गळ्यात हात टाकून गळ्यातील सोन्याची चैन तोडून नुकसान केले व त्यांच्या हात धरून त्यांची ओढाताण केली आणि व मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला व घरामध्ये पलंगावर पडलेले काळया रंगा ची पर्स मधील फिर्यादी यांचा आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, व रोख रक्कम ५७० रुपये काढून घेऊन पळून गेला. म्हणून त्याच्यावर भादविकलम ३९२, ४५२,३५४,५०४,५०६, ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पठारे करत आहे.

अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.