नाशिकः महिलेचा अंघोळ करतानाचं व्हिडीओ मोबाईल मध्ये शुट

वेगवान नाशिक
नाशिक, ता. 22 में –
नाशिक, ता. 22 में 2024 – एकाने महिलेचा अश्लिल व्हिडीओ काढल्याचा प्रकार घडला. हा प्रकार लक्षात येताच महिलेने पोलीसात धाव घेतली आहे. टाकळीरोड भागात खिडकीतून मोबाईलमध्ये हा व्हिडीओ शुट करण्यात आल्याचे महिले पोलीसांना सांगितेल. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरीः विहीरीत पडून मायलेकीचा मृत्यू
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास महिला आपल्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करीत असतांना ही घटना घडली. अनुसयानगर भागात राहणा-या ३४ वर्षीय पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे.
वणी बस स्थानकात पेटली महामंडळाची बस
खिडकीतून कोणीतरी डोकावत असल्याचे लक्षात येताच महिलेने कुटुंबियांच्या मदतीने एका १६ वर्षीय मुलास मोबाईल मध्ये व्हिडीओ काढतांना रंगेहात पकडले आहे. संशयित सोसायटीतील वॉचमनचा मुलगा असून, तो शेजारीच राहतो. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवळी करीत आहेत.
तरुणाचा खून,पोलिसात गुन्हा दाखल
