नाशिक शहर

आर्मी ऍव्हिएशन ट्रेनिंग सेंटरच्या जवानांची चित्तथराक प्रात्यक्षिके

कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्सच्या ४१ व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारोप समारंभ


गांधीनगर येथे कॉम्बॅक्ट आर्मी ऍव्हिएशन ट्रेनिंग सेंटरच्या जवानांची चित्तथराक प्रात्यक्षिके

वेगवान न्युज/wegwan news

देवळाली कॅम्प – युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, सैन्याला रसद व जखमींना उपचारार्थ हलवणे आदींबाबत प्रशिक्षण देणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावरील गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी ऍव्हिएशन ट्रेनिंग सेंटर येथे एव्हिएटर्सचे प्रगत प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या ४२ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या ४१ तुकडीचा दीक्षांत सोहळा बुधवार दि.२२ रोजी सकाळी उत्साहात पार पडला. यावेळी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्सच्या ४१ व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारोप समारंभ गांधीनगर एअरफिल्ड, नाशिकरोड येथे पार पडला, चेतक चित्ता ध्रुव व रूद्र युद्ध भूमीवरील चित्थारक प्रत्याशिक हेलिकॉप्टरने सादर केली. २३ लढाऊ वैमानिक, ८ लढाऊ हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर, ७ आरपीएएस इन्स्ट्रक्टर आणि ४ मानवविरहित आरपीएएस विमानाचे वैमानिक असे एकुण ४२ प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

आर्मी एव्हीएशन कोर चे महानिर्देशक व कर्नल कमांडन्ट अतीविशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कॅ. आशिक कृष्णकुमार (फ्लेजिंग ट्रॉफी), कॅ. इशांत चांदेवाल (पी, के गौर स्मृतीचिन्ह), कॅ. आशिष रांगी (सिल्वर चिता व एस. के शर्मा ट्रॉफी), कॅ. विस्मय भागवत, मेजर शशिकांत (ग्राउंड सब्जेक्ट) मेजर सुधांशु शर्मा (मे. प्रदीप अग्रवाल ट्रॉफी), कॅ. कार्तिक शर्मा (आरपीएएस मेरिट प्रथम), मेजर आशीत आनंद (फ्लाइंग इन्स्ट्रक्टर ओव्हरऑल मेरिट-प्रथम) यांना विशेष व उत्कृष्ट कार्य व प्रशिक्षक म्हणून गौरव करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!