नाशिकः पत्नीच्या डोक्यात पतीने घातली कु-हाड..न्यायालयाकडून जन्मठेपची शिक्षा
नाशिकः पत्नीच्या डोक्यात पतीने घातली कु-हाड..न्यायालयाकडून जन्मठेपची शिक्षा

वेगवान नाशिक / रविंद्र पाटील
नाशिक, ता. -21 में 2024 Nashik news कौटुंबिक वादातून श्रावण किसन गायकवाड (वय ३७) याने पत्नी झोपेत असताना कु-हाडीने खून केल्याचा घटना घडली होती. यानंतर पती म्हणजे श्राववणवर हत्येचा आरोप होता. (रौळस ता.. निफाड ) यामध्ये तो दोषी आढळल्याने निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.व्ही. गुजराती यांनी त्यांला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तरुणाचा खून,पोलिसात गुन्हा दाखल
श्रावण किसन गायकवाड यांच्या पत्नी सीमा श्रावण गायकवाड या त्यांच्या दोन मुलांसह हर्षद (वय 10 वर्ष) आणि जयेश (वय 7 वर्ष) या निफाड तालुक्यातील रौळस येथे राहत होत्या.
मागील भांडणाचा राग मनात धरून महिलेवर केला ऍसिड हल्ला
30 मार्च 2019 रोजी रात्री 11.00 ते पहाटे 2.00 च्या दरम्यान घरातील कामासाठी दारू पिण्याची सवय असलेल्या श्रावणचा सीमासोबत वाद झाला. त्यानंतर रात्री सीमा झोपी गेल्यानंतर त्याने घरातील कुऱ्हाडीने तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली आणि नंतर पळून गेला.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदानातही कांदा फॅक्टर चालला!
याप्रकरणी सीमाचा भाऊ भरत गायकवाड यांनी निफाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून श्रावण किसन गायकवाड याला अटक करण्यात आली.
तपास अधिकारी विष्णू गायकवाड यांनी तपास केला, तर फिर्यादीच्या वतीने सहायक जिल्हा सरकारी वकील रमेश कापसे यांनी तपास अधिकाऱ्यांसह नऊ प्रमुख साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.व्ही. गुजराती यांनी सुनावली.
