दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदानातही कांदा फॅक्टर चालला!

वेगवान नाशिक/अरूण थोरे
निफाड, ता. दि. २० मे 2024 – रोजी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील राज्यातील १३ मतदारसंघाची निवडणूक पार पडली. त्यात राज्यभर चर्चेत राहिलेला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. हा मतदारसंघ निवडणुकीच्या दिवशी ही चर्चेत राहिला तो कांद्या मुळेच. चांदवड व निफाड तालुक्यातील दोन गावातील शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून मतदानाला गेल्याने पोलिस प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला.
सप्तशृंग गडावर प्रवाशांना घेऊन जाणारी टेम्पो ट्रॅव्हल जळून खाक (व्हिडीओ )
विशेष म्हणजे पाचव्या टप्प्यातील मतदानात दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले असुन, मात्र मागील वर्षीच्या तुलनेत २ टक्के घट झाली आहे.ग्रामीण भागात उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याच चित्र काल दिवसभर दिसत होतं. ग्रामीण भागातील ही वाढलेली टक्केवारी कोणत्या उमेदवाराच्या फायद्याची ठरते हा ही चर्चेचा विषय ठरला आहे. तसं पाहिलं तर दिंडोरी हा मतदारसंघ ग्रामीण असुन, कांदा उत्पादकांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे विद्यमान खासदार भारती पवारांवरील कांदा उत्पादकांचा रोष भास्कर भगरेच्या फायद्याचा ठरणार की काय अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिसतेय.
अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात नेमकं काय झाले
हि निवडणूक लोकांनी हातात घेतल्याने भुजबंळासारख्या दिग्गज नेत्याची गोची झाल्याचं पाहीला मिळालं. यात अजित पवार गटातील सर्वच नेते प्रचारात न दिसल्याने त्याचाही काही प्रमाणात परिणाम निकालात दिसुन येईल. या उलट शिवसेना ठाकरे गटातील निफाड चे माजी आमदार अनिल कदम, येवल्यातुन कुणाल दराडे आदी नेते प्रचारात हिरीरीने सहभागी होते. नांदगाव मध्ये मात्र सुहास कांदे महायुतीचा जिव ओतुन प्रचार करताना दिसले, त्याचा फायदा भारती पवारांना किती होतो हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
काल झालेल्या मतदानात उमेदवारांपेक्षा कांदाच ट्रेन्डींगला होता हे मात्र खरं! ग्रामीण भागात अनेकांनी कांद्याने मतदान केल्याचे व्हिडिओ सोशल मिडिया वर फिरताना दिसले. म्हणून कालच्या निवडणुकीत कांदा भावा बद्दलचा रोष उफाळून येतो की काय अशी शंका उपस्थित होते.भगरे की पवार हे चार तारखेला कळलेच मात्र दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांद्यानेच भाव खाल्ला.

अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.