नाशिक क्राईम

मागील भांडणाचा राग मनात धरून महिलेवर केला ऍसिड हल्ला

मागील भांडणाचा राग मनात धरून महिलेवर केला ऍसिड हल्ला


वेगवान नाशिक / सिडको प्रतिनिधी
ता २१/५/२४

मागील भांडणाचा राग मनात धरून महिलेवर ऍसिड फेकुण गंभीर दुखापत केल्याची घटना चुंचाळे परिसरात घडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मंगला सुनील ठोके ( ४५ रा घरकुल योजना चुंचाळे अंबड) यांचे व संशयित आरोपी मधु पहेलवान( रा घरकुल योजना चुंचाळे ) यांचे फिर्यादी यांच्याशी काही दिवसापूर्वी भांडण झाले होते.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

तो राग मनात धरून संशयित आरोपी मधु पैलवान याने सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला मंगला ठोके यांच्यावर ऍसिड हल्ला केला.

या हल्ल्यात महिलेला दुखापत झाली असून याप्रकरणी संशयित आरोपी मधु पैलवान याच्यावर चुंचाळे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील करीत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!