नाशिकचे राजकारण

अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात नेमकं काय झाले

अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात नेमकं काय झाले


वेगवान नाशिक / नाशिक प्रतिनिधी नितीन चव्हाण ता,:२०मे २०२४

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सिडको अंबड भागात सर्वच मतदान केंद्रावर मतदार राजांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान अंबड पोलिसांनी अपक्ष उमेदवार चिन्ह मतदान पावती वाटप प्रकरणे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या कार्यकर्ते यांना गणेश चौक भागातून ताब्यात घेतले आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

सिडकोत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत नाशिक लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सोमवार ता (20) रोजी सकाळी सुरुवात झाली आहे.

सकाळपासूनच गणेश चौक तसेच मोरवाडी हायस्कूल येथे मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा दिसून आल्या.

मतदार हे स्फूर्तीने मतदान करताना पहिल्यांदाच मतदान करणारा तरुणांचा देखील मोठ्या सिडकोतील गणेश चौक भागात अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचे कार्यकर्ते बुधवर निवडणूक चिन्ह असलेले मतदार पावती वाटप करत होते यावेळी अंबड पोलिसांनी सात कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले आहे.

याची माहिती समजतात अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी अंबड पोलीस ठाणे येथे धाव घेतली यावेळी त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांची भेट घेतली कार्यकर्त्यांना नंतर सोडून दिले जाणार आहे असे यावेळी पोलिसांनी सांगितले.

यानंतर अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज पुन्हा मतदार केंद्रावर नागरिकांच्या भेटीसाठी रवाना झाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!