नाशिक ग्रामीण
कांद्याच्या माळा घालून शेतक-यांचे मतदान व्हिडीओ-
Voting video of farmers wearing onion garlands-

वेगवान नाशिक
चांदवड, ता. 20 में 2024 – चांदवड तालुक्यातील शेतक-यांनी आज मतदान करण्याच्या आगोदर कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा आहे.
मतदान करतांना कांद्याच्या माळ आम्ही रोष व निषेध म्हणून या माळा गळ्यात घातल्या आहे. यात कोणताही राजकीय हेतु नाही. सरकारला आमची भावना कळावी हा आमचा उद्देश असल्याचे येथील शेतक-यांनी सांगितले.
चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथील शेतक-यांनी या कांद्याच्या माळ घालून जात मतदान करण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र पोलीसांनी तुम्ही अश्या माळा गळ्यात घालून जावून मतदान करु शकत नाही असे म्हणून त्यांना आडविले.
व्हिडीओ पहा
