नाशिक क्राईम
नाशिकःदुचाकी घसरुन एकाचा मृत्यू
वेगवान नाशिक
नाशिक, ता. 19 में 2024 लेखानगर भागात भरधाव दुचाकी घसरल्याने ३२ वर्षीय मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. हर्षल प्रदिप सुकेनकर (३२ रा.सिडको कॉलनी,पोस्ट ऑफिस जवळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे .याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात चालत्या कारने घेतला पेट ( व्हिडीओ पहा )
सुकेनकर शनिवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास लेखानगर कडून सर्व्हीस रोडने स्टेट बँकेच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.
ब्रेकींगः नाशिक धावती रेल्वेतून धुर निघाल्याने प्रवाशांनी मारल्या उड्या
लाईफ केअर हॉस्पिलट परिसरात भरधाव दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. बेशुध्द अवस्थेत त्यास लाईफ केअर मार्फत रात्री कुटूंबियांनी जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले.