मालेगावः शाळेच्या आवारात एमडी पावडर जप्त
वेगवान नाशिक
मालेगाव, ता. 19 में 2024 – मालेगावमध्ये, शहर पोलिसांनी जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युनिसिपल हायस्कूल आणि कन्या शाळेच्या आवारात छापा टाकून सुमारे 1 लाख रुपये किमतीचे 6.68 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली.
nashik news नाशिकमध्ये अनधिकृत कत्तलखान्यावर छापा : १३ जणांना अटक, गोमांस जप्त
सूचना आणि नियोजन: काही संशयित एमडी पावडर शहरात विक्री आणि वितरणासाठी आणत असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांना मिळाली.
नाशिकः शेयर मार्केट लोभः 59 लाखांचा लावला चुना
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप, उपनिरीक्षक अनिल पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ठाकूर, पोलिस हवालदार काळे, दिनेश शेरावते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी शहरात सापळा रचला.
नाशिक जिल्ह्यात चालत्या कारने घेतला पेट ( व्हिडीओ पहा )
मोहम्मद जुनैद साबीर (रा. आझादनगर), मोहम्मद जुनैद चाऊज उर्फ डोंग्या आणि सदरुद्दीन जलालुद्दीन काझी उर्फ कल्लू (दोघेही रा. निहालनगर) यां आरोपींना शाळेच्या आवारात पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख रुपयांची एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.
ब्रेकींगः नाशिक धावती रेल्वेतून धुर निघाल्याने प्रवाशांनी मारल्या उड्या
नगर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.