दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा कुणाला पावणार ?
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा कुणाला पावणार ?
वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला, ता. 18एप्रिल 2024 –
कांदा निर्यातीवरील बंदी केंद्राने उठवली असली तरी कांदा उत्पादक असलेल्या दिंडोरी मतदारसंघांत अटीतटीचा सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत, लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदार संघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संतापजनक भावना व्यक्त केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत कांदा कोणाला पावणार , हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे.
सरकारच्या सतत बदलणाऱ्या निर्यात बंदी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद हिरावला गेला. वाढता उत्पादन खर्च, खते औषधांच्या किमती, वाढती मजुरी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, होणारा खर्च व निघणाऱ्या उत्पन्नाची शिल्लक यातून हाती काही राहत नसल्याची परीस्थिती आहे
दिंडोरी मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी अधिक आहेत. नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यातीचा मुद्दा वर्षभरापासून तापत आहे. निर्यातबंदी, अवकाळी व पडलेले दर शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे हवामान बदलामुळे कांद्याचे उत्पादन घटणार असे सरकार सांगत असले, तरी होणाऱ्या उत्पादनातून देशाची गरज भागून ते अतिरिक्त ठरेल. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातबंदी पूर्णपणे उठवावी अशी मागणी शेतकरी उत्पादक करत आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने थांबली, कर्जाचा डोंगर चढला. केलेला खर्च निघाला नाही. अवकाळीचे अनुदान अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही. निर्यातीवर लबाडीचा लपंडाव खेळाला गेला. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या दुखण्यांवर मीठ चोळण्याचे काम आता कुणी करू नये, एवढीच अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी बोलून दाखवत आहे
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये