नाशिक ग्रामीण
ब्रेकींगः नाशिक धावती रेल्वेतून धुर निघाल्याने प्रवाशांनी मारल्या उड्या
ब्रेकींगः नाशिक जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली धावती रेल्वे

वेगवान नाशिक / उत्तम गायकर
नाशिक, ता. 18 -उत्तम गायकर /इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव नजीक असलेल्या जिंदल कंपनीच्या जवळ लोकमान्य टिळक टर्मिनस ला जाणारी गोदान एक्सप्रेसला पाठीमागून सहाव्या ते सातव्या डब्याला धुऱ निघु लागल्यामुळे लोकांनी डब्यातून उड्या मारल्या.
चालत्या गाडीतून लागलेल्या आगीचा संशय आल्यामुळे लोक सैरभैर झालेले होते. गाडी थांबतात अक्षरशः एकमेकाला ढकलत दरवाज्यातून तर काही खिडकीतून उड्या मारत आपला जीव वाचवण्याचा प्रवाशांनी प्रयत्न केलेला आहे.
खूप असे लोक त्या ठिकाणी घाबरलेले होते. गोदान एक्सप्रेस अर्थात गोरखपुर एक्सप्रेस ही लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईकडे जात होती.
यामध्ये कुठलीही जीवत हानी झाली नाही. गाडीच्या खालुन धुर आल्यामुळे लोक आग लागली असे समजून उड्या मारत होते…
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा कुणाला पावणार ?
