वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला तालुक्यात वीज कोसळली शेतकरी जखमी
येवला तालुक्यात व शहरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची जोरदार हजेरी
आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या असल्याचे चित्र दिसून आले येवला शहरात गाळ्यांचे पत्र उडाल्याने मोठ्या प्रमाणात गाळेधारकांचे नुकसान झाले आहे विजेचा खांब दुकानावर कोसळल्याने दुकानाचे नुकसान झाले येवला शहरासह परिसरात वादळाने मोठा कहर केल्याचे दिसून आले
येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथे सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसात एका शेतकर्याच्या अंगावर विज कोसळली या घटनेत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे
सायंकाळच्या सुमारास हडप सावरगाव व परीसरात अचानक सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडासहअवकाळी पावसाने हजेरी लावली अशा पावसाच्या वातावरणात राजाराम दादा कोल्हे वय( ५५)हे आपल्या शेतातील घरावरील स्ल्यॅबच्या टाॅवरच्या खोलीतल्या दरवाज्याला पान कागद लावला व त्यावर लोखंडी रॉड ठेवत होते लोखंडी रॉड हातात असतांना विजेचा जोरदार आवाज झाला आणि तिच विज त्यांच्या अंगावर कोसळली व पायाजवळ मोठा आवाज झाला या घटनेत त्यांच्या हाताच्या त्वचेवरील केस जळाले व पायाला गंभीर दुखापत झाली या नंतर त्यांच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव चालू झाला तसेच पायाखालच्या जागेला देखील मोठा खड्डा पडला आहे या घटने नंतर त्यांनी लगेच घरातील सदस्यांना आवाज दिला या नंतर लगेच ते स्ल्यॅबवरच कोसळले अशा परिस्थितीत घरातील सदस्य वरती आले त्यांनी त्यांची परीथ्यिती पाहिली व मुलगा प्रदिप याला फोनद्वारे कळविले त्याचे येवल्यात गॅरेज आहे तो या वेळी गॅरेज मध्ये होता त्याने घराजवळून काही अंतरावर राहत असलेले त्यांचे बंधू विजूनाना कोल्हे यांना या घटनेची फोनद्वारे माहिती दिली त्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेत अशा पावसाच्या वातावरणातही आपल्या चारचाकी वाहनातून नेत पुढील उपचारासाठी राजाराम कोल्हे यांना खाजगी दवाखान्यात दाखल केले होते
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये