शरद पवारांच्या सभेत घुसले चोर! जिल्हाध्यक्षांचे 6 तोळे गेल्याने जीवाला घोर!
Sharad Pawar शरद पवारांच्या सभेत घुसले चोर! जिल्हाध्यक्षांचे 6 तोळे लंपास

वेगवान नाशिक / सागर मोर
वणी, ता. १६ में 2024 – दिंडोरी लोकसभा मतदार संघात वणी येथे बुधवारी, ता. १५ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झालेल्या प्रचारसभेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांची सहा तोळयाची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली असून वणी पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thieves broke into Sharad Pawar’s meeting! District President’s 6 Tole Lumpas
नाशिक जिल्ह्यात वादळाचं तांडव, झाडाखाली माणूस तर कांदाच्या शेडखाली वाहने दाबली (VIDEO )
महाविकास आघाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहिर सभा बुधवारी, ता. १५ रोजी सायंकाळी सहा ते नऊ वाजेच्या दरम्यान संपन्न झाली.
त्याने तिच्या नव-याला सांगितले अनं…तिने त्याच्या बायकोला…की आमचं …
यासभेसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आ. अनिल देशमुख, आ. रोहीत पवार, आ. सुनिल भुसारा यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सभेसाठी दिंडोरीसह लगतच्या सुरगाणा, कळवण, चांदवड, निफाड तालुक्यातून दहा हजारावर नागरिक आले होते.
बागलाण तालुक्यात कांदे नेले चोरुन
रात्री नऊ वाजेच्या सुमारास शरद पवार यांचे भाषण संपल्यानंतर कोडांजी रावबा आव्हाड, वय ७२वर्षे (राष्ट्रवादी कॉग्रेज नाशिक जिल्हा अध्यक्ष ) रा. प्लॉट नं. ५७ पुष्कर बिल्डीग रामदास गार्डन समोर कॅनडा कॉर्नर नाशिक हे व्यासपिठावरुन उतरुन मैदाना बाहेर पडतांना असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कोंडाजी आव्हाड यांच्या गळ्यातील गळ्यातील ६ तोळे वजनाची सोन्याची चैन त्यामध्ये ओम पानचे पॅन्डल असे सुमारे तीन लाख रूपायांंची सोन्याची चैन चोरुन नेली आहे. याबाबत रात्री उशिरा वणी पोलिसांत कोंडाजी आव्हाड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
भारती पवार यांना मत म्हणजे मोदींना आशीर्वाद
