नाशिक जिल्ह्यात वादळाचं तांडव, झाडाखाली माणूस तर कांदाच्या शेडखाली वाहने दाबली (VIDEO )
वेगवान नाशिक/सागर मोर
वणी/ १६ मे २०२४ वणी शहरात वादळी वा-या मुळे संखेश्वर नगरच्या मागील भागात नांगी नाल्याजवळ वादळी वारा व पावसामुळे एका ५५ वर्षीय व्यक्तीचा बाभळीच्या झाडाखाली दाबुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शरद पवारांच्या सभेत घुसले चोर! जिल्हाध्यक्षांचे 6 तोळे गेल्याने जीवाला घोर!
प्रवाशांची लूट करून पलायन करणाऱ्या चोरट्यांना युवकांनी सिनेस्टाइल पाठलाग करत पकडले!
किशोर आंबादास भागवत (वय ५५ ) (मावडी ता दिंडोरी) यांचा बाभळीच्या झाडाखाली दाबुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जोरदार वारा व पाऊस आल्याने झाडाखाली आडोश्याला बसले होते. वादळी वा-यामुळे बाभळीचे झाड त्यांच्या अंगावर पडल्याने बसल्या जागेवर दाबल्या गेल्याने जागीच मृत्यु झाला. त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डाॅ गायधनी यांनी तपासून मृत घोषित केले.
वादळी वार्याने कांदाशेड उध्वस्त –
वणी शहरात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान अचानक वादळीवारा आल्याने सात ते आठ कांदा शेड उडाले असुन लाखो रुपयांची नुकसान झाल्याचा अंदाज आहे.पावसा मुळे वणी पिंपळगाव रस्त्यावरील काही कांद्याचे शेड उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले, तसेच कांदे भिजल्याने मोठ्याप्रमाणात कांदा नुकसान झाले असुन, काही ठिकाणी विजेचे खांब ही पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
त्याने नव-याला सांगितले अनं…तिने त्याच्या बायकोला…की आमचं चालु आहे…मग काय घडलं..वाचा
सकाळ पासून ढगाळ वातावरण होते परंतु उष्णता वाढलेली होती. विजांचा कडकडाट होऊन जोरदार पावसाची सुरवात झाली.अचानक सुरू झालेल्या पावसाने अनेकांची धांदल उडाली.जोरात वारा असल्याने काही ठिकाणी घराचे पत्रे उडाले, तर बाजार पेठेतील विक्रेत्याची एकच धावपळ झाली.
या उन्हाळी विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ
वणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होती. शेकडो ट्रॅक्टर आलेले असल्याने.अचानक आलेल्या पावसाने, शेतकर्कांयाची कांदे झाकण्याची धावपळ उडाली, तसेच कांद्यांच्या खळ्यावरती बांधण्यात आलेले जवळपास आठ शेड हे वादळी वाऱ्यामुळे उडाल्याने शेड मधील कांदे, तसेच काही वाहनांवर शेड पडल्याने नुकसान झाले.काही ठिकाणी काद्यांच्या खळयात कांदे उघड्यावर होते जोरात वारा व पाऊस आल्याने काही ठिकाणी कांदे भिजले.सुमारे अर्धा तास वादळी वारा व पाऊस सुरू असल्याने, झाडांच्या मोठ्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने तारा तुटल्या आहे. वणी पिंपळगाव रस्त्यावरील पारेगांव फाट्या नजीक विजेचे चार ते पाच खांब पडले असुन,विज पुरवठा खंडित झाला आहे.
बागलाण तालुक्यात कांदे नेले चोरुन
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.