नाशिक क्राईम

त्याने नव-याला सांगितले अनं…तिने त्याच्या बायकोला…की आमचं…

त्याने नव-याला सांगितले अनं...तिने त्याच्या बायकोला...की आमचं... nashik news


वेगवान नाशिक / WEGWAN nASHIK NEWS

पंचवटी ,ता. 16  Nashik news फेसबुकवर झालेल्या ओळखीच्या माध्यमातून एका महिलेला ब्लॅकमेल करीत तिच्यावर चार वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या एकावर पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीव्ही चॅनलवर अँकर बनविण्याचे सांगत बळजबरीने विविध ठिकाणी अत्याचार केल्याची तक्रार या महिलेने केली आहे. तसेच, अनैतिक संबंध न ठेवल्यास पती आणि मुलांना मारून टाकण्याची आणि दोघांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे He told the husband and…she told his wife…that our…

बागलाण तालुक्यात कांदे नेले चोरुन

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित दीपक शशिकांत पगारे, र. प्रभात वंदन, सोसायटी, जाणता राजा कॉलनी, पंचवटी यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कार, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 यंदा मान्सून या दिवशी केरळात ! हवामान खात्याचा मोठा अंदाज आला !

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला आणि संशयित दीपक पगारे यांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून चार वर्षांपूर्वी झाली होती. सदर व्यक्तीच्या फेसबुक प्रोफाइलमध्ये  चॅनल टाकले असल्याने पीडित महिलेने अँकरिंग करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या दरम्यान हे दोघे जून २०१९ मध्ये चोपडा लॉन्स परिसरात भेटले होते. यावेळी दीपक पगारे याने पीडित महिलेला आपल्या चारचाकी वाहनात बसवून त्रंबक रोडवरील सोनाली लॉजवर घेऊन गेला आणि त्याठिकाणी गप्पा मारत भावनिक करून बळजबरीने शारीरिक संबंध केले.

नाशिकरोड पोलिसांनी केला ‘या’ टोळीचा पर्दाफाश

त्यानंतर दोन महिन्यांनी मेनरोड येथील चित्रमंदिर सिनेमागृहाजवळ असलेल्या त्याच्या मित्राच्या ऑफिसमध्ये बोलावून कौटुंबिक समस्या सांगत भावनिक करत पुन्हा ऑफिसमध्ये शारीरिक संबंध केले. त्यानंतर वेळोवेळी कौटुंबिक अडचणी सांगत मुलीच्या ऑपरेशन करीत १२ हजार, गाडीचे हप्ते भरण्यासाठी १२ हजार आणि २९ हजार रोख दिली होती. त्यानंतर देखील फोन करून शारीरिक सुखाची मागणी करीत त्रास देत राहिला. गाडीमध्ये अनेकदा दारू पिऊन आणि पीडित महिलेला दारू पाजून शारीरिक संबंध ठेवत त्याचे सेल्फी फोटो काढले होते. त्यानंतर देखील फोन करून शिवीगाळ करीत असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

मोदींच्या सभेत तरुण ओरडला, मोदीजी ‘कांद्यावर बोला’ video

दोन महिन्यांपूर्वी पुन्हा दीपक पगारे याने पीडित महिलेला फोन करुन माझी पत्नी गावी गेली असल्याने तू घरी ये नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेल अशी धामी दिली. नाईलाजाने पीडित महिला दिपकच्या घरी गेली असता दिपकने पुन्हा एकदा तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले. त्यानंतर शनिवार दि. ४ मे रोजी संशयित दीपक पगारे याने पीडित महिलेच्या पतीला बोलावून घेत दोघांमध्ये असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती दिली. यावर पीडित महिलेने देखील दीपक पगारे याच्या घरी येऊन त्याच्या पत्नीला दोघांच्या संबंधाबद्दल माहिती दिली.

सामाजिक तेढ निर्माण करणारे मेसेज व्हायरल कराल तर खबरदार…!

यावेळी दीपक याने पीडित महिलेला मारहाण केली. तसेच, तुझ्या पतीला आणि मुलांना मारून टाकेल आणि तुमचे जगणे मुश्किल करेल अशी धमकी दिली. त्यानंतर शनिवार दि. ११ रोजी संशयित दीपक हा काही संशयित साथीदारांना बरोबर घेऊन पीडित महिलेच्या घरी गेला. आणि माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव अशी धमकी देत पती आणि मुलाला गुंडांकडून मारण्याची धमकी दिली. या घटनांमुळे घाबरलेल्या पीडित महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत आपबिती कथन केली. महिलेच्या तक्रारीनुसार संशयित दीपक शशिकांत पगारे यांच्याविरोधात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!