शेती
बागलाण तालुक्यात कांदे नेले चोरुन
वेगवान नाशिक / अतुल सुर्यवंशी
निरपूर, ता. 16 में 2024- बागलाण तालुक्यातील अंबासन मालेगाव-नामपूर रस्त्यावर देवीदास कोर या शेतक-याने पाच एकर शेतात कांदा लागवड केली होती.
यंदा मान्सून या दिवशी केरळात ! हवामान खात्याचा मोठा अंदाज आला !
शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत अंदाजे ४० ते ४५ क्विंटल कांदा चोरुन नेल्याची घटना घडली आहे.यासाठी त्याना जवळपास १ लाख ३५ हजाराचा खर्च आला.
मोदींच्या सभेत तरुण ओरडला, मोदीजी ‘कांद्यावर बोला’ video
कांदा विक्रीसाठी कोर यानी काही कांदा ट्रॉली मध्ये भरुन ठेवला होता. पावसाचे वातावरण असल्याने ते कांदा झाकण्यासाठी पुन्हा शेतात आले असता कांदा चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी जायखेडा पोलिसात कांदा चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.