कांदा उत्पादकांचा धसका ; देवळ्यात नेते पदाधिकारी स्थानबद्ध
वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा, ता. 15 में 2024 : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे आज बुधवार दि.१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा होत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देवळा तालुक्यातील अनेक नेत्यांना देवळा पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
देवळा तालुका हा कांदा उत्पादनाचे आगार म्हणून ओळखला जातो. आणि हा मोदी सरकारवर कांदा उत्पादक शेतकरी वर्गाची विशेष नाराजी असून, लोकसभा निवडणुकीत या परिसरात कांदा देवळा तालुका हा कांदा बेल्ट म्हणून प्रसिद्ध आहे. यातच मागील काही दिवसापासून शेतकरी संघटना व महाविकास आघाडीतील नेते मोदी सरकारवर सडकून टीका करत आहेत. त्यातच महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक तथा किसान युवा संघटनेचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी शेतकरी मोदींची सभा होऊ देणार नाहीत, असे वक्तव्य केले होते. यामुळे हे नेते मोदींच्या दौऱ्या दरम्यान निदर्शने करू शकतात ही शक्यता लक्षात घेत तालुक्यातील अनेक नेत्यांची आज दि.१५ रोजी उचलबांगडी करत पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे.
मोदींच्या सभेत कुठलाही व्यत्यय नको, यासाठी देवळा पोलीस गेल्या काही दिवसांपासून कामाला लागले आहेत. मागील काही दिवसापासून तालुक्यातील अनेक नेत्यांना, संघटनांच्या पदाधिकारी यांना नोटिसा बजावल्या आहेत.
यांना केले स्थानबद्ध : देवळा तालुक्यातील महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक तथा किसान युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी, शरद पवार गटाचे चांदवड – देवळा विधानसभा अध्यक्ष विजय पगार, प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष कृष्णा जाधव, प्रहार देवळा उपाध्यक्ष हरिसिंग ठोके, इत्यादी नेते पदाधिकारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.