मोदींच्या सभेत तरुण ओरडला, मोदीजी ‘कांद्यावर बोला’ video
वेगवान नाशिक/अरूण थोरे
नाशिक: १५ मे २०२४
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ आज पिंपळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेत कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्यांनी ‘कांद्यावर बोला’ अशी घोषणा करत गोंधळ घातल्याची माहिती समोर येत आहे .
Monsoon Update यंदा मान्सून या दिवशी केरळात ! हवामान खात्याचा मोठा अंदाज आला !
कांदा उत्पादक शेतकरी असलेले किरण सानप यांनी शेतमालाला भाव द्या, कांद्यावर बोला’, शेतकरी सन्मान योजनेचे ६ हजार परत घ्या अशा घोषणा दिल्याने त्यांना ताब्यात घेतले.
Monsoon Update यंदा मान्सून या दिवशी केरळात ! हवामान खात्याचा मोठा अंदाज आला !
मोदींच्या सभेसाठी जिल्हाभरातील अनेक शेतकर्यांनी हजेरी लावली होती. एकीकडे अनेक वृत्तवाहिन्या शेतकर्यांच्या प्रतिक्रिया घेत असताना, ‘कांदा’ या विषयायावर बोलायला सुरुवात करताच पोलीसांनी शेतकर्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच एक दोन दिवस सभेआधी अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध तसेच नोटीसा पाठवण्यात आल्या. म्हणून सरकार कांद्याला घाबरतयं का काय असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.
Monsoon Update यंदा मान्सून या दिवशी केरळात ! हवामान खात्याचा मोठा अंदाज आला !
मोदींनी जिल्ह्यातील गाजत असलेल्या कांदा प्रश्नाला हात घालत, दहा वर्षात ३५ टक्के कांदा निर्यातीत वाढ झाल्याचं सांगितलं, तसेच गेल्या वर्षी सात लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याचा मोदींनी सांगितले.ऑपरेशन ग्रीन अंतर्गत पुन्हा निर्यातीसाठी वाहतुकीवर अनुदान देणार असल्याची घोषणा मोदींनी केली.
मात्र कांद्याची निर्यात विना अटी शर्ती शिवाय होत नसल्याने शेतकरी नाराज झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच कांदा उत्पादकांना ताब्यात घेतल्याने हा नाराजी सुर अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व प्रकारानंतर ही दडपशाही असल्याच्या प्रतिक्रिया उमटत असल्याने भाजपा ह्या प्रकाराकडे कसे पाहते हे पाहणे तीतकेच महत्वाचे ठरणार आहे.
Monsoon Update यंदा मान्सून या दिवशी केरळात ! हवामान खात्याचा मोठा अंदाज आला !
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.