सिन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस Sinner heavy rain
सिन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस Sinner heavy rain
वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
शहा, ता. 14 सिन्नर तालुक्यातील पुर्व भागात आज संध्याकाळी सुमारे सहा वाजेच्या दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावली आहे.. आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज वादळी वाऱा व विजेच्या कडकडासह पावसाने तुफान बॅटिंग केली असून परिसरातील गावांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
नाशिक जिल्ह्यात बस -कार मोठा अपघात तीन ठार ( व्हिडीओ )
मागील आठवड्यात राज्यासह नाशिक जिल्हात पावसाने धुमाकूळ घातला असून सिन्नर तालुक्यातील पुर्व भागात मात्र अद्याप पावसाचं आगमन झालं नव्हतं.. तालुक्यातील काही भागात मात्र या पुर्वी पावसाचे तांडव चालू असतांनाच आज अचानक संध्याकाळी सुमारे ६ वाजता विजेच्या कडकडासह.वादळी वआर्यआबरबरच पावसाने तुफान बॅटिंग केली आहे.
भारताच्या कांद्याची झाली दैना, त्याला कुणी घेईना!
परिसरातील काही भागात कमी जास्त प्रमाणात नुकसान झाले असून कुठलीही जिवित हानी झाली नाही. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे हेमंत गोडसेंना साथ देणार कि मागील खुन्नस काढणार ( व्हिडीओ)
अवकाळी आलेल्या या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असून परिसरातील काळजीत पडलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे..