नाशिक ग्रामीण

चांदवड तालुक्यातील पिकअपला अपघात एक ठार 32 जखमी


वेगवान नाशिक / सागर मोर

वणी, ता. 13 में 2024-  पारेगांव फाट्या नजीक कांद्यांच्या चाळीवर कामाला जाणा-या मजुरांच्या पिकअप गाडीला अपघात होवून एक जण ठार यात चंदभान ठमाजी हिंगले ,वय ५० हा ठार झाला आहे. व ३२ जण जखमी झाले.यातील २७ जणांना वणी ग्रामीण रुग्णालयात तर इतर पाच जण खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भारताच्या कांद्याची झाली दैना, त्याला कुणी घेईना!

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे हेमंत गोडसेंना साथ देणार कि मागील खुन्नस काढणार ( व्हिडीओ)

यातील ९ जणांना गंभीर जखमी असल्याने नाशिक शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले.दि.१३ रोजी सकाळी साडे नऊ च्या सुमारास दह्याने (ता.चांदवड)येथील मजुर वणी येथे काद्यांच्या चाळीवर नेहमी प्रमाणेच कामासाठी येत होते या पिकअप गाडी क्रमांक एमएच १५ एच एच ३६७८ या गाडीत अंदाजे ३२ते३५ जण बसले होते.पारेगांव फाट्या नजीक भरधाव वेगात येताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी जोरात पलटी झाली गाडी पलटी होताच आवाज झाला.

ब्रेकींगः चांदवड तालुक्यात वीज पडून महिला व जनावरे ठार

आजुबाजुच्या धाव जखमींना बाहेर काढुन वणी येथील मिळेल त्या साधनाने ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले.या जखमी मध्ये लहान मुलांचा समावेश आहे.ही माहिती मिळताच दह्याने येथील विलास भवर यांनी तरूणांच्या मदतीने जखमींना मदत केली.इतक्या मोठ्या प्रमाणावर जखमी आल्याने वणी डाॅक्टर असोसिएशन चे खाजगी डाॅक्टर डाॅ.अनिल पवार डाॅ अनिल शेळके डाॅ सोहम चांडोले डाॅ.विराम ठाकरे डाॅ प्रकाश देशमुख यांनीशरुग्णालयात येऊन जखमींवर तातडीने उपचार करून गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतुन नाशिक येथे पाठविण्यात आले.

महाराष्ट्रावर वादळ व गारपीटचे संकट! हवामान विभागाचा अलर्ट जारी

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे एकमेव डाॅ अनंत गाडेकर हे होते.
जखमींवर उपचार करत असतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.येथील लाईट बंद होत्या वातानुकुलीत कक्ष असून तेही बंद पडलेले अश्या परिस्थितीत जखमींवर उपचार करतांना मोठी दमछाक झाली कोंडलेल्या या कक्षात गुदमरलेल्या सारखे होत होते तश्याच परिस्थितीत उपचार करण्यात आले.

भारताच्या कांद्याची झाली दैना, त्याला कुणी घेईना!

तसेच मोबाईलच्या टाॅर्च लाऊन उपचार करण्यात आले.यातील जखमी कल्पना हिंगले वय ४०, तुषार बाळू जाधव वय , रंजना किसन गाडेकर वय ५०, भाऊसाहेब विष्णू गांगुर्डे वय ३५, सुरेखा बाळू वासदेव वय ५०, अंबिका रामू भुसारे वय १७, रोहिणी वीरक हिंगले वय 15, तेजस नाडेकर वय ४, चेतन अशोक हिंगले वय १४ विशाल विरक इंगले वय १३, कार्तिक दत्तात्रय झडे वय तेरा, राजश्री अशोक हिंगले वय ३५, संगीता गोरख हिंगले वय 35, रोहित भाऊसाहेब हिंगले वय १५, मंगला भाऊसाहेब हिंगले वय ३५, निकिता धोंडीराम हिंगले, वय १८, वैशाली अशोक हिंगले वय १५, संगीता राजेंद्र गांगुर्डे वय ४०, सपना सुरेश हिंगले वय १७, शुभम हिंगले वय १७, अशा दशरथ वासदेव वय ४०, मनोहर चंद्रभान हिंगले वय १६, यशराज संजय जाधव वय १४, शुभम काळू सोनवणे वय १६, महेश भाऊसाहेब हिंगले वय १७, रत्ना सोमनाथ शेवरे वय पस्तीस, सोनल रवींद्र भोये वय ३५ सिमा प्रकाश पिठे, पल्लवी संपत सोनवणे, ज्ञानेश्वर संपत सोनवणे, घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डाॅ.संदिप सुर्यवंशी. डाॅ. अनंत पवार यांनी भेट दिली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!