खेळनाशिक ग्रामीण

इगतपुरी : रंगल्या मैदानी कबड्डी स्पर्धा !

इगतपुरी : रंगल्या मैदानी कबड्डी स्पर्धा !


वेगवान नाशिक / उत्तम गायकर

इगतपुरी : ता.१३ मे २०२४ –

आदिवासी बहुल इगतपुरी तालुक्यातील वाघेरे येथे आठ दिवसांपासून चालू असलेल्या अत्यंत चुरशीच्या वाघेरे कब्बडी लीगच्या स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या .

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

खऱ्या अर्थानं तरुण हा मोबाईलच्या गर्तेत गुंतला असून नोकरीच्या शोधातील तरुण हा खेळापासून दूर होत चाललेला आहे. मैदानी खेळ करत रणांगण गाजविताना मैदान कसं मारायचं. हेच आजची तरुणाई विसरली असून त्याला फाटा देत वाघेरे येथे सलग तीन वर्षापासून या खेळाला सुरुवात झालेली आहे .

यामध्ये एकूण सहा संघाने सहभाग घेतला होता . प्रथम पारितोषिक दोस्ती यारी ,द्वितीय पारितोषिक नाद ॐकार गायकर , शुभम भोर , तृतीय पारितोषिक रॉयल शेतकरी व चतुर्थ पारितोषिक एनडी पलटण या संघांनी पटकावले . या व्यतिरिक्त पावनखिंड , आणि पीआर वारीयर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देवून सन्मानीत करण्यात आले.

यामध्ये बेस्ट रेडरचा मानकरी आदित्य भोर , उत्कृष्ट डिफेंडर विशाल भोर , सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून आदित्य भोर यांना पारितोषिक देण्यात आले.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून माजी सैनिक नंदू आंबेकर , हिरामण भोर, विलास मांडे यांनी काम बघितले असून गुणलेखक म्हणून गोपाळ भोर , टाईम किपर नरेंद्र भोर , समालोचक म्हणून दर्शन भोर यांनी आपली जबाबदारी पार पडली . स्पर्धेसाठी विजयी संघांना देण्यात येणाऱ्या ट्रॉफी दीपक मांडे यांच्याकडून देण्यात आले. कबड्डी स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुनील भोर, रमेश भोर ,सोपान भोर ,सागर भोर ,समाधान भोर, विशाल चिकणे आदींनी परिश्रम घेतले. सर्व संघाचं शाहीर उत्तम गायकर यांनी अभिनंदन केले..!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!