नाशिकः पाणी प्रश्न तापलाःअनेक महिला पुरुषांना पोलीसांनी घेतलं ताब्यात
वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला, ता.11मे २०२४
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाणी तापलं आहे. नांदूर मधमेश्वर धरणात जलसमाधी आंदोलनासाठी निघालेल्या वैजापूर, गँगापूर येथील महिला, पुरुष शेतकऱ्यांना पोलिसांनी येवल्यात ताब्यात घेतले आहे
नाशिक जिल्ह्यातील दारणा, भावली, मुकणे आणि भाम धरणातून निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणात नगर आणि निफाड तालुक्यातील गावासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने या पाण्यातून आम्हाला उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळावे यासाठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर येथील महिला आणि पुरुष दोनशेहून अधिक शेतकरी आक्रमक झाले आहे.
उन्हाळी आवर्तनाची मागणी करूनही पाणी न सोडल्याने नांदूर मधमेश्वर धरणातच जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या या महिला पुरुष शेतकऱ्यांना येवला लासलगाव पोलिसांनी येवला हद्दीतच ताब्यात घेतल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाणी प्रश्न पेटला आहे.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये