वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला, ता. 9मे २०२४ –
येवला तालुक्यात गेल्या कित्येक दिवसापासून उष्णतेचे तापमान 40-42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते.परंतु गुरुवारी दिनांक 9 मे रोजी दुपारी साडेतीन वाजता अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले.
काही शेतकऱ्यांच्या कांद्याच्या पोळी उघड्यावर पडलेल्या असल्यामुळे झाकण्यासाठी मोठी धावपळ उडाली होती.तसेच शेतकऱ्यांचे उभे असलेल्या डोंगळ्याचे अल्पशा प्रमाणात नुकसान झाले
.अवकाळी पाऊस येवला तालुक्यातील सातारे,जऊळके पिंपळगाव लेप या परिसरात कोसळतांना गल्ली बोळातून पाणी वाहताना दिसुन येत होते.
पूर्वीचे जेष्ठ नागरिक सांगायचे की,अक्षय तृतीयेच्या केळ्या पाण्याने भरून काढण्यासाठी अक्षय तृतीयेच्या सणाला पाऊस नक्की येत असतो.याच प्रमाणे एक दिवसांवर येऊन ठेपलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तवर पाऊस आला असं म्हणायला काही वावग ठरणार नाही.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये